शासनाचे वतीने दोषसिध्दीचे प्रमाण वाढविणे करिता वारंवार शासन परिपत्रके / मार्गदर्शक सुचना प्राप्त होतात. त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री. बच्चन सिंह सर (IPS) यांनी आपले अधिनस्त सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वारंवार सूचना व मार्गदर्शन करुन दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ व्हावी या करिता विशेष प्रयत्न सुरु केले. याच प्रयत्नाच्या फळ स्वरुप पोलीस ठाणे मालेगांव अंतर्गत आरोपी नामे 1. दामोधर संपत सहस्त्रबुध्दे वय 45 वर्ष 2. विलास बद्री पट्टेबहादुर वय 30 वर्ष + 2 रा. मुंगळा ता. मालेगांव यांचे विरुध्द सन 2016 मध्ये दाखल अप.क्र.418/ 16 क. 354, 294, 506, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामध्ये मालेगांव पोलीस स्टेशन कडुन सदर गुन्हयाचा सखोल तपास
करुन प्रकरण न्याय प्रविष्ठ करण्यात आले होते.
दि.28.07.22 रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मालेगांव यांचे न्यायालयाकडुन नमुद प्रकरणाचा न्यायनिवाडा झाला असुन आरोपी 1. दामोधर संपत सहस्त्रबुध्दे वय 45 वर्ष 2. विलास बद्री पट्टेबहादुर वय 30 वर्ष रा. मुंगळा ता. मालेगांव यांचेवर आरोप सिध्द झाल्याने नमुद आरोपीतांना 02 वर्ष सश्रम कारावास व नगदी प्रत्येकी 1000/- रु दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.स्टे. मालेगांव येथील तपास अधिकारी मपोउपनि अश्वीनी धोंडगे यांनी केलेला असुन पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ शिरुभाऊ ब.नं. 62 यांनी कामकाज पाहीले आहे.
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सर (IPS), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. गोरख भामरे साहेब (IPS) व उपविपोअ वाशिम श्री. सुनिल पुजारी साहेब यांचे मार्गदर्शनात मालेगांव येथील प्रभारी अधिकारी श्री. किरण वानखडे यांनी गुन्हयातील साक्षीदार यांना वेळोवेळी साक्ष बाबत मार्गदर्शन करुन गुन्हया मध्ये दोषसिध्दी करिता प्रयत्न केलेले आहे.
0 Comments