मंगरुळपीर येथील किशोर रामनारायण बाहेती व विजय रामनारायण बाहेती याच्या मातोश्री मोहिनिदेवी बाहेती यांचे 16 ऑगस्ट 22 रोजी निधन झाले.
17 ऑगस्ट 22 ला सकाळी 10:30 ला अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
तसेच भारत सरकारने 17 ऑगस्ट 22 ला सकाळी 11वाजता राष्ट्रगान घ्यावे असे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने राष्ट्र प्रेमी असलेल्या राजस्थानी समाजाने स्वर्गीय मोहिनिदेवी बाहेती यांची अंत्ययात्रा थांबवुन शासनाच्या आदेशानुसार 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले . यामुळे अंत्ययात्रेमध्ये असणाऱ्या नागरिकांचे व बाहेती परिवाराचे राष्ट्रीय प्रेम पाहून स्वातंत्र्य काळात भारतातील वीरांनी दिलेल्या बलिदानाला आजची खरोखर श्रद्धांजली ठरली आहे राजस्थानी समाजाने रूढी परंपरेला मूठ माती देऊन अंत्ययात्रा थांबवुन देश प्रेमाची कबुली दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र "आजादी का अमृत महोत्सव" अर्थात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे.
या उपक्रमासाठी देशातील स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल यंत्रणा, सर्व विद्यापीठे, शाळा व महाविद्यालये, पोलीस यंत्रणा अशा सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन बाबींशी निगडीत यंत्रणांद्वारे समुह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या उपक्रमाच्या जाणीव जागृती व प्रसार व प्रचार मध्ये सर्व प्रशासकीय विभागांचे मोठे योगदान राहीले आहे. याप्रसंगी सामूहिक राष्ट्रगान करण्यासाठी सुनील मालपाणी, हरीश बियाणी, संजय राठी, पप्पू बंग, नीरज बजाज, अनिल भन्साली, पुरुषोत्तम चितलांगे , नितीन बंग, सतीश भुतडा ,रमेश नावंदर,अभिषेक दंडे,प्रमोद घोडचर, पप्पू महाराज तिवारी, मुन्नाभाऊ राठी, नारायण बाहेती, दिनेश व्यास, कृष्णा भुतडा, मुकेश राठी , राजू बंग, गणेश बजाज, गोलू बाहेती, योगेश व्यास, पत्रकार पवन राठी, वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, व पंचकोशीतील महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
वृत्त संकलन वाशिम खबर
आवाज महाराष्ट्राच्या वतीने
0 Comments