वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
मंगरूळपीर =
चितलांगे इन्डेण गॅस एजन्सीच्या वतीने शहापुर बायपास येथिल विठ्ठल रुख्मिनी मंदिरामध्ये सुरक्षा क्लिनिक व मालतीबाई अफझलपुरकार शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,व शालेय वस्तुंचे वितरण, वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांना मोमेंटो देऊन सत्कार कार्यक्रम असे विविध कार्यक्राम सपन्न झाले.
स्वातंत्र्य दिनाचे अैचित्य साधुन सदर कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमाला 300 पुरष व महिला मंडळी उपस्थित होती, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नागपुर येथिल इंडियन ऑयलचे अधिकारी श्री डि.डि.पौनीकर, तहसिलदार शितलताई बंडगर मॅडम,धनज प्लंटचे उपप्रबंधक दिपक कुंभारे, यवतमाळ इंडियन ऑयलचे सेल्स ऑफिसर निलेशजी ठाकरे तसेच मंगरुळपीर येथिल चितलांगे इंन्डेण ग्रॅस एजन्सीचे पुरुषोत्तम चितलांगे, विठ्ठल मंदिर सदस्य एम.सी.राऊत,दयारामजी चव्हाण, मनोहरराव सोळंके , किशोरजी भुतडा ,देवानंद राऊत, सुलेखाताई वानखडे, प्राचार्य रविंद्र खुणे, राधाताई केदार, सौ. उगलेताई, जयकुमार गुप्ता, अब्दुलजमीरभाई, सुमंत जहागीरदार, विनोदजी डेरे प्रमुख अतिथी उपस्थित होते.
गॅस सुरक्षितता बाबत उपयुक्त मार्गदर्शन या प्रसंगी मंचकावरील सर्व प्रमुखंनी आपल्या भाषणात केले चितलांगे इंन्डेण यांच्या या उपक्रमाबाबत व नेहमीच होणाऱ्या सामाजिक उपक्रमाबाबत उपस्थित वक्त्यांनी प्रशंषा केली सुरक्षितेत या विषयात प्रश्न मंजुषा या प्रसंगी घेण्यात आली होती त्यामधील उत्तरे देणाऱ्या 10 महिलांना बक्षिषांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम चितलांगे तर आभार प्रदर्शन दयाराम चव्हाण यांनी दिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमीरभाई, नितीन बोरकर, चंद्रकांत कांबळे, निलेश राठोड,शफाकतअली, रोशन राठोड,गणेश धोटे,शुभम ढोबळे,रफिकभाई, गोपाल वर्मा इत्यादी सह सर्वांनी प्रयत्न केले.
0 Comments