महान संशोधक , शास्त्रज्ञ ( सायंस्टिट) अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षता ( Relativity ) चा सिध्दांत मांडून
E= mc² म्हणजेच ,
कार्यशक्ती = पदार्थांचे वस्तुमान × प्रकाशाचा वेगवर्ग हे सूत्र विकसित केले . यामुळे विज्ञानाचे गूढ उकलण्यास व विज्ञानाला उभारी देण्यास मोलाची मदत झाली . या विश्वामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कार्यकारणभाव हा परस्परांशी निगडित असतो हा विचार दृढ झाला . अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सापेक्षता सिध्दांताचा हा मूळगाभा मानला जातो . हाच धागा पकडून किंवा हिच बाब डोळ्यासमोर ठेवून जनकल्याणाच्या संदर्भातील अनेक क्लिष्ट समस्यांचा गुंता सोडवणाऱ्या राजकीय क्षेत्राचा विचार का होऊ नये असा प्रश्न निर्माण होतो . आइनस्टाइनचा सिध्दांत व राजकारण यांचा संबंध जोडतांना बहुतेकजण दचकून जातील याचीही कल्पना आहेच . या निमित्ताने वडाची साल पिंपळाला असे कुणी म्हटल्यास तेही वावगे नसेल . पण होय , ही सांगड घातल्या जाऊ शकते . याचाच आधार घेत राजकारण नावाचा अवघड वाटणारा विषय सोपा करून सांगण्याचा हा अपरिचित प्रयत्न आहे .
विविध राजकीय पक्ष निवडणुकांच्या माध्यमातून आपल्या पक्षाविषयीचा जनमताचा कौल तपासून आपली राजकीय ताकद आजमावून सत्तेपर्यंत पोहचण्याची धडपड करतात . यामध्ये कधी यश मिळते . कधी अपयश . सत्तास्थापनेसाठी जेव्हा अपेक्षित असणाऱ्या स्पष्ट बहुमताचा आकडा प्राप्त करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मिळत नाही तेव्हा अनेक पक्षांची युती - आघाडी निर्माण होऊन सरकार बनवलं जाते . असल्या सरकारमध्ये परस्पर विचारधारेचे राजकीय पक्ष सामिल झालेले असल्यामुळे त्यांच्यामध्ये नको त्या कारणांवरून कुरबुरी वाढिस लागतात . तेव्हा मग जनहिताच्या व विकासाच्या मुद्द्याला प्राधान्यक्रम देताना मर्यादा पडतात . एकमेकांची मर्जी - नाराजी सांभाळण्यातच बराचसा वेळ खर्ची होतो . जनता व त्यांच्या आशा - आकांक्षांचा विसर पडत जातो . जवळच्यांची पाठराखण आणि दुरच्यांवर
सूड उगवण्याची अघोषित चढाओढ लागलेली दिसून येते . लोकांच्या विकासातील अडसर व सरकारच्या डोक्यावरील अस्थिरतेची टांगती तलवार ह्या दोन्ही बाबी दूर करण्यासाठी कोणत्यातरी एखाद दुसऱ्या राजकीय पक्षाकडे एकहाती सत्ता सोपवणे अगत्याचं असते ." प्रजास्त्र " हा मूलमंत्र त्यासाठी वरदानरूपी हत्यार ठरू शकते . हे प्रजास्त्र कधी , कुठे आणि कसे वापरायचे त्याची सुध्दा एक विशिष्ट अशी पध्दत आहे . नेमक्या व उचित समयी त्याचं गूढ उकलणे हितकारक ठरते .
----------------------------------------
इथे धाकटे म्हणजेच विविध छोटे - छोटे राजकीय पक्ष आणि थोरले म्हणजे ( single largest party ) सर्वात मोठी सदस्यसंख्या असणारा पक्ष . महाराष्ट्रात २०१४ पासून भाजप हा single largest party म्हणून उदयास आलेला राजकीय पक्ष आहे . पण स्पष्ट बहुमताऐवजी या पक्षाला सुध्दा आपल्यापेक्षा कमी सदस्यसंख्या असलेल्या पक्षाच्या कुबड्या घेऊन राज्यशकट हाकावा लागतोच . त्यामुळे लोकविकास कामे करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असून या पक्षाला ठोस व व्यापक प्रमाणात प्रागतिकतेची उंच भरारी घेता येत नाही हे कटू सत्य आहे . धाकट्यांच्या घोडचूका उजागर करताना त्या २२ इतक्या संख्येत निघतात . त्यापैकी प्रथम क्रमांकाची घोडचूक १) तळ वास्तवाचा विपर्यास , आणि शेवटीची २२) अतिरेकी जनद्रोह , अशी असेल . बाकी उर्वरित २० घोडचूका ह्या निवडणुकीच्या रणांगणाला सुरूवात झालेली असताना प्रत्यक्ष कृतीव्दारे त्यावर अचूक हल्ला चढवून प्रतिपक्षाला दाखवून द्यायच्या असतात . हेच प्रजास्त्राचे मर्मभेदी काम आहे . सापेक्षतेची खरी कसोटी येथेच लागते .
लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड
९५०३८५७९९८
0 Comments