Ticker

6/recent/ticker-posts

दीपस्तंभ फाऊंडेशन पुण्याचे पालक दीपकभाई शहा . यांनी दिव्यांग लेक चि.दीक्षा हिचा मंगल विवाह सोहळा आनंदात पुणे येथे संपन्न


9 ऑगस्टच्या शुभ दिनी आपली दिव्यांग लेक चि.दीक्षा दिंडे हिचा मंगल विवाह सोहळा चि.अमोल सुतार या अत्यंत उमद्या तरुणाबरोबर अतिशय उत्साहात व आनंदात पुणे येथे संपन्न झाला.अमोल ट्रेकिंग कॅम्पस्, गड-किल्ल्यांच्या भेटींचे, तसेच मॅरेथॉनचे आयोजन करणे, या क्षेत्रात कार्यरत आहे.


चालण्याची अडचण असलेल्या दीक्षाला तिच्या आईने  सावलीसारखी साथ देऊन, कडेवर, खांद्यावर उचलून घेऊन उत्तम घडवलं.
या मंगल विवाहाच्या आयोजनासाठी आपल्या दीपस्तंभ फाऊंडेशन पुण्याचे पालक दीपकभाई शहा यांनी 

विशेष पुढाकार घेतला. संस्थेचे मुख्य सल्लागार एम्. व्ही.कोतवाल काका व काकू यांनी आवर्जून उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले तसेच श्री व सौ दलाल, उमेश मधुरे, योगेश शार्दुल, प्रणिता काबरा , डॉ.आराधना श्रीवास्तव, टेकचंद सोनवणे, पूजा सोनवणे, सौ निंबाळकर, लक्ष्मण शिंदे या आपल्या परिवारातील सदस्यांनी सुध्दा आवर्जून उपस्थित राहून आशीर्वाद दिले. माझी लग्नातील भूमिका अर्थातच मुलीच्या मामाची होती.


चि.सौ दीक्षा 5 सप्टेंबरला लंडनला युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार आहे.आपल्या परिवारातून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणारी दीक्षा ही पहिली मुलगी असेल .


विवाह प्रसंगी आपण उपस्थितांना पुस्तक भेट स्वरूपात दिले, रक्तदान शिबिर आयोजित केले, तसेच अवयवदान जागरूकता फॉर्म भरून घेण्यात आले.

आपल्या परिवाराकडून नवविवाहित दांपत्याला मनःपूर्वक शुभाशिर्वाद! नांदा सौख्यभरे...!!!

Post a Comment

0 Comments