Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र महीला विकास मंच, व विधवा महिला सन्मान कायदा अभियान या संघटनेच्या वतीने ,जाहीर निषेध, जाहीर निषेध,

              
आज गुरुवार दि. 25/8/2022 सायं. 5 वाजता, शिवाजी चौक, वाशी येथे, जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. 
सामुहिक बलात्कार आणि हत्याकांड, त्यामुळे आजन्म कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांची गुजरात सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी निर्दोष सुटका केली. 
     न्यायाच्या समर्थनार्थ आणि बिल्कीस बानो व त्यांच्या कुटुंबीयांना पाठबळ देण्यासाठी, नवी मुंबईतील विविध सामाजिक संघटना, संस्था, व्यक्ती सहभागी झाल्या. त्या आंदोलनात महाराष्ट्र महीला विकास मंच, विधवा महिला सन्मान कायदा अभियान या संघटनेच्या राज्य महासचिव रेवती ताई आढाव यांनी सुद्धा आपला जाहीर निषेध व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. तसेच नवी मुंबई शाखेच्या उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, सचिव निशा केदारे, सहसचिव माधवी सूर्यवंशी,  कोषाध्यक्ष वंदना चिंचोळकर, सदस्य विजया कदम, लक्ष्मी माने, पुष्पा कांबळे, रेखा इंगळे, छबु चौधरी, चित्रा कोठारी ईत्यादी महिला उपस्थित राहिल्या. तसेच महाराष्ट्र महीला परिषद अध्यक्षा नीलाताई लिमये, स्त्री मुक्ती संघटनेच्या वृषाली ताई मगदूम, अजित दादा मगदूम,  रिपब्लिकन सेना
 अध्यक्ष  ख्वाजा मिया पटेल, अलका दुग्गल ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. न्याय न मिळाल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन उभे करू

Post a Comment

0 Comments