Ticker

6/recent/ticker-posts

१५ ऑगस्ट दिनाच्या पुर्व संधेला जिल्हयात यशस्वीरीत्या कोम्बींग ऑपरेशन

     वाशिम जिल्हा पोलीस

१५ ऑगस्ट दिनाच्या पूर्वसंधेला वाशिम जिल्हयात मा. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात दिनांक १३/०८/२२ रोजी २३.०० ते दि.१४/०८/२२ चे ०५.०० वा. दरम्यान वाशिम जिल्हयातील ०३ ठिकाणी वाशिम, रिसोड, मंगरुळपीर, ०९ पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हेशाखेचे अधिकारी व पोलीस अमलदार याच्या मार्फत सदर कोम्बींग ऑपरेशन मध्ये एकुण १९ अधिकारी १०५ अंमलदार यांनी सहभाग नोंदवुन यशस्वी रित्या कोम्बींग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली.
कोम्बींग ऑपरेशन हे संपुर्ण वाशिम शहरात पो.स्टे. मोठेगाव, चिंचाबाभर, पारधी वस्ती, आजुबाजुचा परिसर पो.स्टे. मंगरुळपीर शहरात, शेलुबाजार, पेडगाव, चादई, दाभा, मोहरी, पोटी, खडी, कवठळ कोठारी, चिखली, या परिसरात कोम्बींग ऑपरेशन चे आयोजन करुन वाशिम जिल्हयात सध्या घरफोडी, चोरी, मोटार सायकल चोरी या सारख्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरीता सर्व अधिकारी / पोलीस अमलदार यांनी आपआपले पो.स्टे स्तरावर पुढीलप्रमाणे कार्यवाही केली आहे. एकुण तडीपार ४७, निगराणी बदमाश०८, मालमतेचे गुन्हेगार४७, सराईत गुन्हेगार१७, एमपीडीए अॅक्ट प्रमाणे०४, मोक्का अॅक्ट प्रमाणे ०५, NBW/BW वॉरंट मधील ०९चेक केले व १ आरोपी अटक करण्यात आला. त्याप्रमाणे हॉटेल धाबे, लॉजेस चेक करून गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला.
सदर कोम्बींग ऑपरेशन चे आयोजन मा. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात मा. गोरख भामरे अपर पोलीस अधिक्षक वाशिम यांच्या नियंत्रणात उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम, तसेच स्थागुशा येथील पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी राबविले. वाशिम जिल्हयात वेळोवेळी कोम्बींगचे आयोजन करण्यावर भर दिला जाईल व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्याकरीता उपाययोजना करण्यात येतील असे मा. पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments