दिनांक 31.08.2022 रोजी पासून गणेशोत्सव संपूर्ण जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नकता. परंतु यावर्षी पूर्ण ल्हासात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव साजरा करतांना गणेश मंडळ व पोलीस प्रशासनांनी योग्य समन्वय ठेवून साजरा करणे आवश्यक आहे. वाशिम जिल्हयात एकुण 710 गणेश मंडळांची स्थापना होणे संभावित असून त्यामध्ये शहरी भागात 270 मंडळे आणि ग्रामीण भागात एकुण 440 मंडळ स्थापन
होणार आहेत.
गणेशोत्सव दरम्यान जिल्हा प्रशासन आणि जनता यांचे मध्ये समन्वय रहावा या करीता दिनांक 23.08.2022 रोगी 11.00 वा. जिल्हाधिकारी कर्यालय, वाशिम येथे मा. जिल्हाधिकारी, वाशिम यांचे अध्यक्षतेखाली, पोलीस अधीक्षक, वाशिम आणि इतर विभागाचे अधिकारी, गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकते, शांतता समिती सदस्य यांची जिल्हास्तरीय समन्वय व शांतता बैठक पार पडली आहे. गणेशोत्सव विसर्जन मार्गातील समस्या/ अडथळे जाणून घेण्यासाठी संबंधित विभागांचे वरीष्ठ अधिकारी यांनी संयुक्तरीत्या मार्गाची पाहणी केली आहे. आज दिनांक 29.08.2022 रोजी मा जिल्हाधिकारी वाशिम, मा पोलीस अधिक्षक वाशिम यांनी वाशिम शहर येथील गणेशोत्सव विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. उपविभाग स्तर आणि पोलीस स्टेशन स्तरावर संबंधित अधिकारी यांनी संयुक्तिकरीत्या विसर्जन मार्गाची
पाहणी केली आहे. विसर्जन मार्गात असणारे खड्डे, नादुरुस्त वाहने लावलेल्या विदयुत तारा केवल इत्यादी अडथळे दूर करण्याचे प्रयत्न
प्रशासन स्तरावर सुरु आहेत. अदयाप पावेतो गणेशोत्सव निमीत्त पूर्व तयारीचा आढावा महणून पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडुन विट अंमलदार आणि शांतता समिती सदस्य यांच्या मिटींग घेण्याचे सत्र सुरु आहे. अदयाप पावेतो एकूण 360 ग्रामभेटो दिल्या असून जनतेशी थेट संपर्क साधुन गणेशोत्सव साजरा करतांना निर्माण होणान्या अडचणीचा आढावा घेण्यात आला आहे. गणेशोत्सव दरम्यान कोणताही अडथळा निर्माण होउ नये याकरीता अदयाप पावेतो एकूण 06 पोलीस स्टेशन स्तरावर रूट मार्च आणि दंगा का योजना राबविण्यात आली आहे. इतर ठिकाणी घेण्याचे नियोजित आहे. अवैध धंद्यावर प्रतीबंध घालण्याच्या अनुषंगाने जुलै. 2022 पर्यंत जुगार 556 दारुबंदी 1272 केसेस तसेच माहे ऑगस्ट मध्ये जुगार 50 दारुबंदी 220 फेसेस करण्यात आल्या आहेत. समाजकंटक यांचे कडुन अनुचित प्रकार पडु नये याकरीता प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. समाजकंटक यांचे कृत्यांवर निगराणी ठेवणे करीता विसर्जन मार्गात ठिकठिकाणी सीसीटीव्ह कॅमेरा लावण्यात येत आहेत. प्रत्येक गणेश मंडळावर QR कोड लावण्यात येणार असुन भेट देणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकडुन नियमित QR कोड स्कैन करण्यात येईल. सराईत गुन्हेगार यांचे घर बचक रहावा या करीता यापुर्वीच पोलीस स्टेशन स्तरावर विविध दिवशी कॉम्बींग ऑपरेशन आणि नाकाबंदी रामविण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहेत. ध्वनी पातळीच्या मर्यादयावत ध्वनि प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 मधील तरतुदीचे आणि मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे संतोतंत पालन करावे. गणेश मंडळांनी सणाचे पावित्र्य राखुन सामाजीक एकोपा टिकून राहावा या दृष्टीने नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण
उत्साहात साजरा करावा.
श्री गणेश उत्सव निमित्त वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 01 पोलीस अधिक्षक 01 अपर पोलीस अधिक्षक, 04 पोलीस उपअधिक्षक, 15 पोलीस निरीक्षक, 50 सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, 01 SRPF कंपनी, 02 RCP पथक 02 QRT पथक, 1100 पोलीस अंमलदार 500 होमगार्ड इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे. कोणतीही कायदा व सुव्यवस्था परीस्थीती हाताळण्यास वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे. आगामी गणेशोत्सव नियमांचे पालन करून उत्साहात आणि शांततेत साजरा करा असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत
0 Comments