Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.‌

        
  मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगावतील नामांकित स्कूल किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे हौशी मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत भाग घेतला सदर मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली होती 
सुमारे पाचशे  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेला प्रमुख पाहुणे  जळगाव जिल्ह्याचे अप्पर  पोलीस अधीक्षक कुमार चिंता सरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर स्पर्धा ही काव्यरत्नावली चौक ते बॅरिस्टर निकम चौक पुन्हा काव्यरत्नावली चौकात येऊन समाप्त झाले. किड्स गुरुकुलचे फाउंडर श्री आदेश ललवाणी सर तसेच युवासेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विराज कावडिया स्कूलच्या प्रिन्सिपल मीनल जैन मॅम ,व्हॉइस प्रिन्सिपल  ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी  Sir, युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप , शाळेचे क्रीडा शिक्षक सागर सोनवणे,जहीर  शेख,मेहुल इंगळे तसेच इतर शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते. सदर स्पर्धेतील विजेता स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments