Ticker

6/recent/ticker-posts

शेलुबाजार निशांत बँक अध्यक्षा कडुन गौरी पुजना करीता हार वाटप.

 
मंगरुळपीर 
 

शेलुबाजार येथील निशांत मल्टीस्टेट को.ऑपरेटिव्ह बँक शाखेच्या स्थानिक संचालक मंडळाच्या  वतीने  शेलुबाजार परिसरात गौरी स्थापन करणाऱ्या ग्रामस्थाच्या घरी 
  फुल व हाराचे वाटप करण्यात आले  मागील सात वर्षांपासून हार फुल वाटपाचे  कार्य यांच्या कडुन अविरत चालत आले आहे.  परिसरातील नागरिकांच्या घरी गौरी स्थापना करण्यात येत असते. या गौरी करिता चांगल्या दर्जाचे हार उपलब्ध व्हावे  तसेच गौरी स्थापन करणाऱ्या भक्तमंडळी वर हाराचा  खर्च वाढू नये या सर्वाचा विचार करून निशांत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँक शाखेच्या स्थानिक संचालक मंडळाणे स्वतः आपल्या जवळून हार फुलाचा खर्च करून गोरगरीब नागरिकांच्या, गौरी भक्तांच्या घरी पूजेकरिता हार फुल उपलब्ध करून दिले. या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे
गोविंदा भेराणे,  शरद ठाकरे, गणेश पवार, अमर जैस्वाल, ललित गुप्ता, राम राऊत, सुदर्शन धोटे, डॉ.सुबोध काळे, बाबाराव पवार, महाविर तोडरवाल, दिलीप वानखडे,राजु भोसले, सुनिल हरणे, जय गुप्ता, रवि अरबाड, हिम्मत चव्हाण,रुपेश हरणे, पवन राठी  यावेळी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments