प्रतिनिधी:- सचिन राणे
भाऊसाहेब लहाने कला महाविद्यालय पिंजर येथे दिनांक ०५ सप्टे २०२२ रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्याल याच्या मराठी विभागातील प्रा. बापुराव डोंगरे यांनी वरील उद्गार काढले. ते म्हणाले की, कला शाखा मनाला बळकटी देते. जीवनाला समृद्ध करण्याची क्षमता या शाखेत आहे. अनेक नोकरीं व रोजगाराच्या संधी या शाखेच्या माध्यमतुन उपलब्ध होऊ शकतात. त्याकरिता जिद्द व मेहनत करणे त्यासाठी आवश्यक आहे; असे ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. आपत्ती व्यवस्थापनातील कार्याची दखल घेऊन अध्यक्ष व आयोजकांच्या वतीने प्रा. डोंगरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल ठाकरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. नानासाहेब सपकाळ, मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक वाहूरवाघ मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंकज तायडे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख वासुदेव भगत, इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील मनवर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका बजावली. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद व लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीए भाग ०३ ची विद्यार्थिनी कु. तेजल सोनवणे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन कु. प्रतीक्षा तिडके हिने मानले.
0 Comments