मंगरुळपिर= क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम तालुका संयोजक मंगरुल्पिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक 29/11/2022 ला लक्ष्मी चंद विद्यालय शेलू बाजार येथे घेण्यात आल्या .
यास्पर्धा मध्ये सिद्धार्थ विद्यालय मंगरूळ पिर येथिल १४ वर्षा आतील मुलीचा संघ कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाला . या सांघा मध्ये 1)गौरी गणेश पाटील 2)चैताली. अमोल पोफळे 3) जया सुखदेव गोदमले 4 ) निसर्गा गौतम नीचडे 5)प्रतिज्ञा प्रवीण चव्हाण 6 ) प्रतीक्षा राहुल भगत. 7 ) मोहिनी बाबाराव गोदमले 8)शेजल श्रीचेंद राठोड 9 ) सलोनी संतोष राठोड 10 ) साहिती दिलीप खडसे 11)चंचल श्रीचंद राठोड 12 ) दिक्षा संजय उंदरे. या मुलींनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखऊन तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यांना संस्था सचिव अशोक भाऊ कांबळे ;मुख्याध्यापिका कु.किरण कांबळे ; पर्यवेक्षक सिद्धार्थ कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या क्रीडा शिक्षक जे.जी. उगले व अनिल मनवर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच विद्यालयातील शिक्षक गजानन जगताप ; राजू सोनोने; भास्कर जीवने; गिरीश उजवणे ;राजेश राऊत ; राम व्यवहारे;राजू तेलंग ; रघुवंशी ;देशमुख ;भेडेकर ; मिसाळ; चेव्हण, गावंडे, शिक्षिका सुलभा कांबळे; जयश्री भोयर ;अर्चना देशमुख ; अंजली वाघमारे सर्व शिक्षक शिक्षीका व विद्यार्थी यांनी पुढील स्पर्धा करीता शुभेच्छा दिल्या.
0 Comments