वाशिम - चर्मकार समाजातील बुटपॉलीश करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे रामभाऊ खंडारे यांनी खडतर मेहनत करुन मुलगा दीपक खंडारे याला उच्च शिक्षण दिले. व दिपक खंडारे यांनी एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवत राज्यकर निरिक्षक पदापर्यत पोहचूवन आपल्या आईवडीलांचे स्वप्न पुर्ण केले. या यशाबद्दल दीपक खंडारे व त्यांचे वडील रामभाऊ खंडारे यांचा जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे व मित्रमंडळाच्या वतीने खंडारे यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या सत्कारप्रसंगी प्रा. दिलीप जोशी, सुवर्णकार श्याम दुरतकर यांच्यासह खंडारे कुटुंब उपस्थित होते. दीपक खंडारे हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशिम शहराध्यक्ष सतिश खंडारे यांचे पुतणे आहेत. स्थानिक रोहिदासनगर येथील रहिवासी दीपकचे वडील बुुटपॉलीश करुन कुटुंब चालवतात तर आई ऑईल मिलमध्ये काम करते. दीपकचे शिक्षण पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये झाले. दीपकने १२ वीपर्यतचे शिक्षण वाशिम येथे तर उच्च शिक्षण पुणे येथे पुर्ण केले. आपल्या मुलाने खुप शिकून मोठे व्हावे, मोठे अधिकारी व्हावे अशी त्याचे वडील रामभाऊ व आई तुळसाबाई यांची इच्छा होती. त्यासाठी आईवडीलांनी राबराब राबून मुलाच्या शिक्षणासाठी पैशाची भरपाई केली. व दीपकनेही राज्य कर निरिक्षकपदाचे यशोशिखर गाठून आईवडीलांचे स्वप्न पूर्ण केले. यापुर्वी पीएसआय परिक्षेत फायनल लिस्टमध्ये दीपकचा क्रमांक ४-५ क्रमांकाने कटला होता. मात्र त्याने खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास केला व एसटीआय पदापर्यत मजल मारली. या सत्कारप्रसंगी बोलतांना लॉ. धाडवे म्हणाले की, दीपक खंडारे यांनी घवघवीत यश मिळवून आपल्या आईवडीलांसह समाजाची प्रतिष्ठा उंचावली आहे. चर्मकार समाजातील इतर युवकांनी त्याचा आदर्श घेवून आपले उज्वल भविष्य घडवावे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments