Ticker

6/recent/ticker-posts

सरपंचपदासाठी रस्सीखेच ग्रा.पं. निवडणूकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मानोरा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतच्या निवडणूक लागल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी विविध गावातील गाव पुढारी आणि राजकीय दिग्दज यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आमदरी येथे भाजपा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण आणि बाजार समितीचे सभापती गोविंद चव्हाण यांची आसोला खुर्द येथे काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पं.स.चे गटनेते गोपाल पाटील भोयर यांची तसेच आमगव्हान येथे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर चौधरी, अभईखेडा येथे पं. स.चे माजी उपसभापती महेश राऊत, एकलारा येथे काँग्रेस पक्षाचे दिलीप चव्हाण, भुली येथे माजी पं. स. सदस्य अशोक ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले असून गाव

चव्हाण, चिखली येथे माजी पं. स. सभापती भवसिंग राठोड, देवठाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील जामदार, भोयनी येथे माजी जि. प. सदस्य भाऊ नाईक, माहुली येथे बाजार समितीचे संचालक राम राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापू लागले असून गाव 
यावेळी सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडणूका लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित होणाऱ्या
ग्रामपंचायती तसेच मागील
पुढाऱ्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान निवडणूक उमेदवारी अर्ज सादर करण्याचा कालावधी असुन ५ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे.

७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून दुपारी ३ वाजल्यानंतर चिन्ह वाटप केले जानार आहे. तर आवश्यकतेनुसार १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. २० डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. तालुक्यातील घोषित ग्रामपंचायती मध्ये २२ ग्रामपंचायतीचे सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव आहे.

अनुसूचित जाती- कारपा, गिरडा, मेंदा, धानोरा बु. व अनुसूचित जाती स्त्री राखीव साठी अभईखेडा, एकलारा.

अनुसुचीत जमाती - भिलडोंगर, सावळी, शेंदोना व अनुसूचित जमाती स्त्री राखीव

नामाप्र साठी देऊरवाडी, सोमनाथ नगर, असोला खुर्द व नामाप्र स्त्री राखीव- सोमठाणा, तोरणाळा, गोस्ता, भुली,

सर्वसाधारण करिता आमदरी, हातोली, खापरदरी, हातना, पंचाळा, जनुना खुर्द, म्हसणी, वसंतनगर, पोहरादेवी तर सर्वसाधारण स्त्री राखीव- देवठाणा, रोहना, साखरडोह, सिंगडोह, धावंडा, माहुली, खांबाळा, भोयणी, चोटि आमगव्हाण, वापटा, सोयजना, रुद्राळा ह्याप्रमाणे आरक्षण आहे. - रुई, हिवरा खुर्द, वटफळ.असे आहे आरक्षण


Post a Comment

0 Comments