वाशीम - क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, पददलित यांच्या सामाजिक शैक्षणिक उत्क्रांतीसाठी संपुर्ण हयातभर कार्य केलेले असून त्यांच्या दुरदृष्टीमुळेच सर्वसामान्य माणसांत शैक्षणिक क्रांती घडून आल्याचे प्रतिपादन काजळांबा येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पेठे यांनी केले. सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, महात्मा फुले हे कर्तेसुधारक होते. शिक्षणाची गंगा सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळा काढल्या. त्यांची उर्जा घेऊनच आज खेडोपाडी सावित्रीच्या लेकी शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जेष्ठ शिक्षक जे. एस. चव्हाण, बी. एम. महाले, प्रा.कु.आर.डी.काडोदे, एस.बी.लहुटे, एच.पी.हांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हि.यु. डाळणे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.डी.डी.निलखन यांनी केले तर प्रा. रतन राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व्हि.के. कापसे, प्रा.भागवत देशमुख, ए. व्ही. गावंडे, एस. एन. पायघन, व्हि.पी. महाले, प्रा.अब्दुल रमीज, प्रा. आरसोड, बापुराव मोटे, सुरेश उगले यांनी अथक परिश्रम घेतले. परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्याची उपस्थिती होती.
0 Comments