Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच पदासाठी ८ तर सदस्यासाठी ३ अर्ज !

वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर                आवाज महाराष्ट्राचा

२८७ ग्रामपंचायतींची निवडणूक, अर्जासाठी २ डिसेंबरची मुदत

वाशिम ५२ 
कारंजा ५७  
मालेगाव ४८
रिसोड ४५ ‌‌
मंगरूळ पीर ४४ 
 मानोरा ४१
एकूण २८७
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सरपंच पदसाठी ८ तर सदस्य पदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

सोमवारपासून उमेदवारी अर्ज सादर करण्याला सुरूवात झाली असून, मंगरूळपीर तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही. वाशिम तालुक्यातून सदस्य पदासाठी एक तर सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागात गुलाबी थंडीत राजकारण पेटले असून, ग्रामपंचायतवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.



तालुका - सदस्य -सरपंच

वाशिम - १ - २ 

मालेगाव  - ०-२

रिसोड      -०-२

मं. पीर      -०-०

कारंजा.     - २ -१

मानोरा.      - ०-१

राजकारण पेटले असून,
ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध
करण्यासाठी गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Post a Comment

0 Comments