संग्रही फोटो
मंगरुळपीर तालुका येथील ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालकांकडून काही मुद्द्यांची माहितीही मागवण्यात आली होती. ती अद्याप सादर करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या अवर सचिव से. दि. कदम यांनी ३१ ऑक्टोबरला आरोग्य सेवा आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून आवश्यक माहिती पाच दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले
आहेत.
मंगरुळपीर येथील ग्रामीण
रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने प्रस्तावाची तपासणी करून काही मुद्दयांची पूर्तता करण्यासाठी २१ सप्टेंबर २०२१ रोजी आरोग्य सेवा व अभियान संचालक आरोग्य, आरोग्य सेवा संचालनालयाला पत्राद्वारे कळवूनही अद्याप आवश्यक माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणावर लोकप्रतिनिधी, तसेच सर्पमित्र तथा युवक परिषद, मंगरुळपीरच्या संचालकांकडून वारंवार पाठपुरावा होत
रुग्णालयात आहे. त्यांचे ३० ऑगस्ट २०२२ रोजीचे पत्र आरोग्यमंत्र्यांनी तपासून उचित कार्यवाहीचे निर्देश अवर सचिवांना दिले. त्यानुसार प्रस्ताव पुढे सादर करण्यासाठी आवश्यक माहिती पाच दिवसांत उपलब्ध करण्याचे निर्देश आरोग्य सेवा संचालनालयाच्या सचिवांनी दिले आहेत.
0 Comments