Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम = रिसोड तालुक्यातील कवठा खुर्द येथे युवासेनेची शाखा स्थापन

रक्तदान शिबीरात अनेकांचा सहभाग : नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार
वाशिम - युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हा विस्तारक कामेश जाधव, जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्या मार्गदर्शनात आणि युवासेना रिसोड उपतालुकाप्रमुख परमेश्वर कांबळे यांच्या पुढाकारातून रिसोड तालुक्यातील कवठा खुर्द येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व शिवसेना अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून मंगळवार, २२ नोव्हेंबर रोजी युवासेना शाखा उद्घाटन, पदाधिकार्‍यांची निवड, पक्षप्रवेश व रक्तदान शिबीर घेण्यात आले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना रिसोड तालुकाप्रमुख सुभाष बोरकर, उद्घाटक म्हणून वाशिम मंगरुळपीर विधानसभा युवासेना अधिकारी गजानन ठेंगडे तर प्रमुख पाहूणे म्हणून महिला आघाडी जिल्हाप्रमुख . मंगलाताई सरनाईक, युवती सेना जिल्हाप्रमुख प्रिया महाजन, उपशहरप्रमुख आकाश कांबळे, काटा सर्कलप्रमुख दिपक मुठाळ, सोनु गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर फित कापून शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमात ४० युवकांनी युवासेनेत प्रवेश घेतला. या सर्वाचा तालुकाप्रमुख सुभाष बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कवठा खुर्द शाखा कार्यकारणी स्थापन करुन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. शाखा कार्यकारणीमध्ये शाखाप्रमुख संदीप साबळे, उपशाखाप्रमुख संजय मांडवगणे, शाखासचिव संजय मानमोठे, सहसचिव रामदास जाधव, कार्याध्यक्ष राम नवघरे, सोशल मिडीयाप्रमुख आकाश मानमोठे व सदस्य म्हणून विष्णू पोपळघट, विजय गव्हाणे, मारोती कांबळे, शाम लेहनकार, अरुण कांबळे, समाधान जाधव, बाळु भोसले आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून युवासेना कवठा सर्कलप्रमुखपदी अश्विन नेहुल, उपसर्कलप्रमुख राहुल मानमोठे व रिसोड युवती तालुकाप्रमुखपदी सौ. नंदा कांबळे यांची निवड करुन त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरात २० जणांनी सहभाग घेवून ऐच्छिक रक्तदान केले. या शिबीरात गोपाल सावसुंदर, आश्विन नेहूल, डॉ. गणेश पायघन, सुरेश राऊत, हर्षल मानमोठे, भागवत कोल्हे, आकाश खंदारे, सागर खराटे, नारायण लोणकर, विशाल पुंड, शाम भोने, गणेश सावसुंदर, राजु काठोळे, सचिन मारोडकर, ज्ञानेश्वर पोपळघट, पवन वाढवे, गौरव बोराडे, आरिफ शेख या युवकांनी सहभाग घेतला. रक्तसंकलनासाठी महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुपच्या सहकार्यातून वाशिम ब्लड सेंटरच्या डॉक्टरांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments