Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई ०३ मोटारसायकल चोरांना अटक व त्यांच्याकडून ०३ मोटारसायकली, किंमत रू.१,००,०००/- हस्तगत व वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे मोटारसायकल चोरीचे ०३ व हळद चोरीचा ०१ असे एकूण ०४ गुन्हे उघड

वाशिम दि. २२/११/२०२२
दि. ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी श्री. मयुर अंबरलाल हुमने, वय ३१ वर्षे, चंदा-नोकरी, रा. रेल्वे गेट नं. 47 मुर्तिजापुर, जि. अकोला यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे समक्ष येउन फिर्याद दिली की, त्यांची काळया रंगाची स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल क्र. एम.एच. ३० ए.जी. २१०३ ही दि. १८/०८/२०२० रोजी जुनी आय. यु.डी.पी. कॉलनी, वाशिम येथून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप.क. ७८६/२०२०, कलम ३७९ भादवि अन्वये नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल ही आरोपी नामे रवी शिंगारे, रा. श्रीरामपुर कॉलनी, पुसद, जि. यवतमाळ याच्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने डिबी पथक, वाशिम यांनी पुसद येथे जाउन आरोपी नामे रवी संतोष शिंगारे, वय २३ वर्षे, रा. धम्म नगर, श्रीरामपुर कॉलनी, पुसद, जि. यवतमाळ यास ताब्यात घेतले व त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी एक हिरो होंडा सिडी डॉन कंपनीची काळया रंगाची विना नंबरची मोटारसायकल किंमत अंदाजे 30000 /- overline a एक होंडा शाईन कंपनीची काळया रंगाची मोटारसायकल किंमत अंदाजे ५०,०००/- अशा ०२ मोटारसायकली मिळून आल्या. त्यानंतर त्याच्याकडे नमूद दोन्ही मोटारसायकली बाबत विचारणा केली असता त्याने होंडा शाईन ही मोटारसायकल हेलीपॅड, पुसद येथून चोरल्याचे व हिरो होंडा सिडी डॉन ही मोटारसायकल अनसिंग, ता. जि. वाशिम येथील बस स्टॅन्ड वरून चोरल्याचे सांगितले व आय.यु.डी.पी. कॉलनी, वाशिम येथील हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल दिग्रस, जि. यवतमाळ येथील सयद रफीक सयद सलाउद्दीन याच्यासह मिळून चोरल्याचे व ती रफीक याचा भाउ सयद नजमोधीन उर्फ कालू यास विकल्याचे सांगितले. त्यानंतर सयद रफीक सयद सलाउद्दीन व सयद नजमोद्दीन उर्फ कालू यांना चोरीच्या मोटारसायकल सह ताब्यात घेण्यात आले व तिन्ही आरोपी नामे १) रवी संतोष शिंगारे, वय २३ वर्षे, रा. धम्म नगर, श्रीरामपुर, पुसद, जि. यवतमाळ २) सयद रफीक सयद सलाउद्दीन, वय ३७ वर्षे, रा. झेंडा चौक, मोतीनगर, दिग्रस, जि. यवतमाळ व ३) सयद नजमोधीन सयद सलाउद्दीन, वय ३२ वर्षे, रा. झेंडा चौक, मोतीनगर, दिग्रस, जि. यवतमाळ यांना अप. क. ७८६/२०२२ या गुन्हयात अटक करण्यात आली. नमूद आरोपीतांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये डेहणी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ येथून एकूण २८ कट्टे हळद, एकूण किं. रु. १,२०,०००/- चोरल्याची कबुली दिली आहे. सदर बाबत आर्णी पोलीस स्टेशन, जि. यवतमाळ येथे अप.क्र. ३७८ / २०२२, कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे १) रवी संतोष शिंगारे २) सयद रफीक सयद सलाउद्दीन व ३) सयद नजमोद्यीन सयद सलाउद्दीन यांच्या कडून खालील प्रमाणे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत:-

१) पो.स्टे. वाशिम शहर अप.क्र. ७८६/२०२०, कलम ३७९ भा.दं.वि. २) पो.स्टे. अनसिंग, जि. वाशिम अप.क्र. ६१ / २०२२ कलम ३७९ भा.दं.वि.

३) पो.स्टे. वसंतनगर, पुसद अप क. ७१६ / २०२२ कलम ३७९ भा.दं.वि. ४) पो.स्टे. आर्णी, जि. यवतमाळ अप.क्र. ३७८/२०२२, कलम ३७९ भा.दं.वि.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सो., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी साो. यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार श्री. रफीक शेख यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकाचे सपोनि रमाकांत खंदारे, पो.ह.क्र. ३४७ / लालमणी श्रीवास्तव, पो.ना.क. ८५६ / रामकृष्ण नागरे, पो.ना.क. २१०/ज्ञानदेव मात्रे, पो.शि.क. २४३ / विठ्ठल महाले व पो.शि.क. ३०३ / संदीप वाकुडकर यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments