Ticker

6/recent/ticker-posts

अनियमित कामकाज करणाऱ्या ग्राम सेविकेवर कारवाई करा


गिर्डा-वार्डा उपसरपंचासह इतर सदस्यांचे वरिष्ठांना निवेदन

प्रतिनिधी किशोर राठोड मानोरा

मानोरा-तालुक्यातील गिर्डा- वार्डा येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवीका यांच्यावर अनेक आरोप करीत या ग्रामपंचायत मधील उपसरपंचासह इतर काही सदस्यांनी त्यांची त्वरीत चौकशी करून त्यांना कार्यवाही करा अशी तक्रार  केली आहे. 
संबंधित ग्रामसेवीका ह्या आमच्या प्रश्नांना दादच देत नाहीत,आणि सर्वकाही आपल्याच मनमर्जीने हुकुमशाही करीत असल्यासारखे रुबाब दाखवून जनतेची दिशाभुल करतात असेही या तक्रारीत नमुद आहे. कोणत्याही गोष्टीबाबत आग्रहाने विचारणा केल्यास "मला तुमच्या गावात कामच करायचे नाही" असे बोलून पळ काढण्याची त्यांनी एक नवी पद्धत शोधून काढली आहे असे तक्रार कर्त्यांचे म्हणणे आहे. दिवाळीत खांबांवर बसविण्यात आलेल्या दिव्यातील खरेदीप्रकारात झालेला भ्रष्टाचार असो की त्याआधी ग्रामपंचायत मधील सामान्य फंडातील खर्च असो अशा अनेक गोष्टीबाबत त्या कोणत्याही प्रकारची माहिती  स्पष्ट करीत नसून आमच्या कडून फसव्यापद्धतीने सह्या घेतल्या जातात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या मनमानी कारभाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कराई अशी तक्रार संबंधित तक्रार कर्त्यांनी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील विवीध ग्रामसेवकावर होणाऱ्या आरोपामध्ये आणखी भर पडली असून ग्रामसेवक हेच ग्रामभक्षक असल्याची चर्चा सर्वञ रंगत आहे. 
संबंधित तक्रारीवर उपसरपंच राम राठोड यांच्यासह सदस्य बलदेव राठोड, वर्षा राठोड, संजीवनी राठोड आणि रिना बेलखेडे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments