Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शन संपन्न-

मंगरूळपीर-मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात, माननीय सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत दिनांक-09/12/2022 शुक्रवार रोजी हस्तकला प्रदर्शन संपन्न झाली.
हस्तकला प्रदर्शनी चे उद्घाटक आदरणीय सौ. प्रियाताई च. ठाकरे, अध्यक्ष- प्राचार्य डॉ.एस. एच. कान्हेरकर सर ,प्रमुख अतिथी प्रा. दिव्या , समन्वयक प्रा. सौ. एस. एस. जाजू उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले व त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 
प्रास्ताविकामध्ये प्रा. सौ. सुषमा जाजू यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काही वेगळे म्हणून या प्रदर्शनीचे आयोजन केले. या प्रदर्शनीचे उद्दिष्ट स्पष्ट केले  कमवा व शिका या उक्तीला अनुसरून तसेच सुप्त गुणांना चालना मिळावी , फावल्या वेळेचा सदुपयोग, आर्थिक सहकार्य इत्यादी दृष्टिकोन समोर ठेवून या प्रदर्शनीचे आयोजन केले.   
उद्घाटक सौ. प्रियाताई ठाकरे यांनी उद्घाटन प्रसंगी या शिक्षणामुळे आत्मविश्वास ,उत्पादकता या गुणांचा विकास होतो याकरिता अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन नेहमी नक्की करावे असे प्रतिपादन केले . 
प्रमुख अतिथी प्रा. दिव्या गावंडे यांनी अभ्यास मंडळ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केले.  
अध्यक्ष भाषणात प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांनी सुशिक्षित वर्गातील युवतींना भेडसावणारी बेरोजगारीची समस्या दूर करताना केवळ देशात मोठे उद्योग असून भागत नाही तर स्वयंरोजगार करिता लहान सहान उद्योग मोठ्या संख्येने सुरू करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. 
   यानंतर प्रदर्शनीचे उद्घाटन फीत कापून आदरणीय सौ प्रियाताई ठाकरे, प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर, आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संपन्न झाले.
या प्रदर्शनी मध्ये बी.ए. व बी. एस. सी. चे एकूण 80 विद्यार्थिनीने सहभाग नोंदविला. या प्रदर्शनीमध्ये वेस्ट पासून बेस्ट, कागदी बॅग, फ्लावर्स, कृत्रिम फुले, मायक्रोनचे विविध वस्तू, लोकरीचे तोरण, बंगला, भरतकले चे साहित्य इत्यादी अनेक विविध वस्तू या प्रदर्शनी मध्ये लावण्यात आले होते.  
या कार्यक्रमा मध्ये प्रा. डॉ. वाघोळे , प्रा. डॉ. पवार , प्रा. डॉ. खान यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तसेच                             
                                                 अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे जबाबदारी बी. ए. च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडली .वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. ही प्रदर्शनी माननीय चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन ,प्राचार्य डॉ. कान्हेरकर सरांच्या मार्गदर्शनात, प्रा. सौ. एस. एस. जाजू यांनी आयोजित केली .कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भावना खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रणाली भोयर यांनी मांडले व बहुसंख्य विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतला व हे हस्तकला प्रदर्शनी यशस्वी संपन्न झाली.
                      

Post a Comment

0 Comments