तुकाराम मुंढे हे त्यांच्या कार्यशैलीसोबत त्यांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे प्रसिध्द आहेत. दरम्यान आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी पुन्हा बदली झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली. दरम्यान तुकाराम मुंढे याच्या बदलीसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी पत्र लिहून मागणी केल्याचे समोर आलू आहे.
तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलं होतं अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मुंढे धमकावत असल्याची तक्रार तानाजी सावंत यांनी या पत्रात केली आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
तानाजी सावंत यांनी मुंढेच्या बदलीमागे त्यांचा हात नसल्याचे म्हटले होते. ही प्रशासकिय बदली असल्याचे तानाजी सावंत म्हणाले होते. तानाजी सावंत यांनी पाठवलेलं हे पत्र ९ नोव्हेंबर या तारखेचं असून हे पत्र १४ नोव्हेंबरला मुख्यमंत्री कार्यालयात इनवर्ड झालं. त्यानंतर या पत्रावर शेरा देण्यात आला की या प्रकरणी अहवाल सादर करा आणि त्यानंतर तानाजी सावंत यांच्या पत्रावर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली.सावंतांनी पत्रात काय म्हटलंय?तुकाराम मुंढे यांनी ठाण्यात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता पदावर असणाऱ्या विशिष्ठ आधिकाऱ्याला त्यांना न विचारता खात्यातून बाजूला केलं. तसेच तुकाराम मुंढे हे आपलं काही ऐकत नाहीत, त्यामुळे आरोग्य खातं आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी होईल असे तानाजी सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे. या पूर्वी देखील मुख्यमंत्र्याच्या समोर तुमचं काम सुधारा असे तुकाराम मुंढे यांना सांगण्यात आलं होतं असं देखील सावंत यांनी या पत्रात म्हटल आहे.
0 Comments