अॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर असोसिएशनचा पुढाकार
वाशिम - अत्यंत जुनी व विविध जटील रोगांवर परिणामकारक, विना औषध, विना ऑपरेशन आणि कमी खर्चिक असलेल्या अॅक्युपंक्चर थेरपीच्या प्रभावी उपचारपध्दतीची लोकांना माहिती होवून त्यांचा त्याचा लाभ मिळावा या हेतूने अॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर असोसिएशन भारतच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा व तालुृक्यात मोफत अॅक्युपंक्चर आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे यांनी दिली.
शिबीराबद्दल माहिती देतांना डॉ. हिवाळे म्हणाले की, विना औषध, विना ऑपरेशन असलेली अॅक्युपंक्चर ही अत्यंत जुनी भारतीय उपचार थेरपी आहे. जगभरात सहा हजार वर्षापासून विविध आजारांवर या थेरपीचा वापर केला जातो. भारतात ही थेरपी मोठ्या प्रमाणावर स्वीकारली गेली आहे आणि ती पाश्चात्य औषधांमध्ये सूचीबद्ध आहे. अॅक्युपंक्चर हे कर्करोग आणि इतर प्राणघातक रोगांसाठी सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह उपचारांपैकी एक आहे. कर्करोगाच्या उपचाराची लक्षणे कमी करण्याबरोबरच, ही थेरपी वेदना आणि कर्करोगाच्या उपचारांच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करते. राज्यात वैद्यकीय क्षेत्रात अॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला कायद्याने मान्यता मिळाली आहे. राज्यपालांच्या मान्यतेनंतर १ जुलैपासून हा कायदा अंमलात आला आहे. त्यानुसार अॅक्युपंक्चर पद्धतीचे अध्यापन व व्यवसाय यांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषद स्थापन करण्यात आली आहे. या परिषदेअंतर्गत राज्यात हजारो अॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करत आहेत. व रुग्णांना लाभ होत आहे.
क्युपंक्चर उपचाराने गुडघा, खुबा, खांदा इ. सांध्यातील वंगण वाढवता येतो, त्यामुळे सांध्याचे ऑपरेशन करण्याची पाळी येत नाही. मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इ. विकारासाठी मणक्यांच्या सांध्यात वंगण वाढवून तसेच मणके व दोन मणक्यांच्यामध्ये असलेल्या डिस्कमधील एनर्जी वाढवून दबलेल्या शिरा मोकळ्या केल्या जातात, त्याही ऑपरेशनशिवाय. त्यामुळे हात-पाय दुखणे, बधीर होणे वा मुंग्या येणे हे शिरा दबल्यामुळे होणार्या विकारासाठी गुण येतो. गुडघेदुखी, संधिवात, कंबरदुखी, स्लीप डिस्क फ्रोझन शोल्डर, टाचदुखी, मानदुखी, ऑस्टिओपोरोसिस इ. हाडांच्या सर्वच विकारांसाठी क्युपंक्चर हा उत्तम उपाय आहे. पेन किलर गोळ्या खाल्याने मेंदू बधीर होऊन दुखणे जाणवत नाही, परंतु आतल्या आत सांधे आणि मणके जास्त खराब होतात आणि नंतर ऑपरेशनची पाळी येते. मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे होणार्या लकव्यासाठी क्युपंक्चर फार गुणकारी आहे. रुग्ण जेवढे लवकर येईल तेवढा उपचाराचा अवधी कमी असतो. आपल्या शरीरात ८०० अॅक्युपंक्चर पॉईंट्स असतात. जिथे सुई टोचून उपचार केले जातात. अॅक्युग्राफ नामक कम्प्युटरद्वारे केल्या जाणार्या शरीराच्या तपासणीमुळे रोगाचे मूळ कारण शोधून अॅलर्जी, संधीवात, मधुमेहाचे दुष्परिणाम, उच्चरक्तदाब, लिव्हर, किडनी, हृदयविकार, लठ्ठपणा, मेंदूचे विकार, अंधत्व इ. तसेच मायोपॅथी, मोटरन्युरॉनडिसिज, मल्टिपल स्क्लेरोसिससारख्या अनेक असाध्य विकारांसाठी चांगला आणि विना औषध विना दुष्परिणाम उपचार होऊ शकतो. कोणत्याही दुष्परिणामाशिवाय लाभ देणार्या उपचार पध्दतीमुळे कोरोना महामारीत अनेक रुग्णांचे प्राण वाचु शकले. त्यामुळे कोरोना आजारावरही ही थेरपी फायदेशीर असल्याचे सिध्द झाले आहे. डब्ल्युएचओने मान्यता दिलेल्या या अॅक्युपंक्चर थेरपीची रुग्णांना माहिती होवून त्यांना त्याचा लाभ घेता यावा या दृष्टीकोनातून अॅक्युपंक्चर प्रॅक्टीशनर असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी लवकरच मोफत आरोग्यशिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. हिवाळे यांनी दिली.
0 Comments