Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत निवडणुका २ दिवसावर रविवारी मतदान, योग्य व्यक्तीलाच करा गावचा कारभारी


रविवारी १८ डिसेंबरला होत असलेल्या निवडणूकीत थेट जनतेतून सरपंच निवडायचा दोन दिवसावर असलेल्या
ग्रामपंचायत निवडणुकीला गागागावातील स्थानिक व पक्षीय राजकारणाला अधिकच पेव फुटले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणे प्रक्रिया पार पडल्यावर आता ग्राम पंचायतच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत येवू लागला आहे. त्यामुळे योग्य व कार्यक्षम व्यक्तीलाच गावाचा कारभारी करा, असा सूर गाव गावातील सुज्ञ मतदार राजामधून उमटत आहे.
 आपल्याच गटाचा सरपंच निवडून यावेत, यासाठी गावागावात असलेले राजकीय व स्थानिक गट प्रयत्नशील आहे. तरी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या ग्रामविकासाच्या लोकोपयोगी योजना ग्रामस्तरावर राबवून गाव विकासाचा ध्येय ठेवल्यास आदर्श गावाची संकल्पना पूर्ण होवू शकते. याकडे कटाक्षाने गावपुढारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. गटा तटाचे राजकारण करून गावाचा धिंगाणा केल्यापेक्षा प्रचारादरम्यान एक मेकांच्याविरोधात असलेल्या उमेदवारांचे उनेदूने काढून गावात निवडणुकीचा ताप वाढविण्यापेक्षा गटातटाकडे न पाहता सुज्ञ मतदारांनी योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, असा सूर गावकऱ्यांमध्ये उमटत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांना रस्ते, विज, पाणी, शिक्षण व आरोग्य आदी समस्या भेडसावत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे ही गोष्ट विकास कामात बाधा आणणारी आहे. त्यामुळे तेच ते जूने चेहरे निवडून न देता निवडणूक मैदानात उतरलेल्या नवीन शक्तीला विजयी करण्याची भाषा मतदार जूने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना तोंडावर बोलून त्यांची बोलती बंद करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.निवडणुकीच्या चर्चा पानटपरी, किराणा दुकान, चौका चौकात आणि गाव पुढाऱ्यांच्या घरी निवडणुकीबाबत आराखडे बांधण्यात येत आहेत. जसा जसा निवडणुकीचा दिवस रविवार जवळ जवळ येत आहे, तस तसे सोशल मीडिया वर प्रचार सुरू असून भ्रमणध्वनी करून मलाच मते द्या, असे उमेदवार मतदार राजांना आकर्षित  करून विकासाचे गाजर दाखवत आहे. लबाडांच्या आश्वासनाला मतदार राजा बडी पडणार नसल्याचेही अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. जो करेल गावचा विकास तोच निवडून येणार यावर्षी हमखास.

गावाचा पुढारी होण्यासाठी धडपड भारी !
केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारची वित्त आयोगाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट जमा होत असल्याने आपल्या हातूच गाव विकासाला चालना मिळावी, त्याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये, असा कल गाव पुढाऱ्यांचा असू शकते, त्यामुळे मीच गावाचा पुढारी व्हावे, यासाठी मतदारांनी माझ्या पारड्यात मतदान करावे, यासाठी धडपड सुरू आहे. थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक व थेट सरपंच यांच्या खात्यात गाव विकासासाठी निधी सरळ वळता होणार असल्याने सदस्य पद है फक्त मानपानाचे पद राहणार आहे. तरीसुद्धा पळवा पळवी सुरूच आहे. या आधी निवडून आलेल्यांनी काय कामे केली व गावचा विकास कोण करणार अशांनाच आता मतदान राजा विजयाची माळ गळ्यात घालणार, दिग्गज राजकीय नेत्यांना कित्येक गावातून विरोध केल्या जात आहे.
      व्यसनाला विकासापेक्षा जास्त प्राधान्यक्रम दिला जातो बाकी काही नाही. पाच वर्षातल्या एका रात्री ५०० रुपये मिळालेले बरं का घरात रोज नळाचे पाणी आलेले बरे ? मटनाची थाळी बरी का दारातलं स्वच्छ गटार परं ? दारू पार्टी बरी का, आजूबाजूला डास, दुर्गंधी नसलेलं शांत घर बरं ? 
ह्या गोष्टीचा विचार आपल्याला आज करणे काळाची गरज आहे. तेव्हाच गाव समृद्ध होईल नारीशक्तीला होत असलेला त्रास आणि जो करेल गावचा विकास तोच यावर्षीचा सरपंच खास

Post a Comment

0 Comments