Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या 36 हजार 606 प्रकरणात1 कोटी 54 लक्ष 19 हजार रुपयांचा दंड वसूल


जिल्हयात अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यादृष्टीने परिवहन विभाग आणि पोलीस विभाग मोटार वाहन कायदयाच्या विविध कमलमाअंतर्गत वाहतूकीचे नियम पालन न करणाऱ्या 36 हजार 606 प्रकरणात 1 कोटी 54 लक्ष 19 हजार 200 रुपये दंड 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नागरीकांकडून वसूल करण्यात आला.

जिल्हयात चारही दिशेने राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे तसेच रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाल्यामुळे वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभाग सातत्याने दक्ष असतो. प्रवास करतांना हेल्मेट न घालणे, सिट बेल्ड न लावणे, नियमापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे तसेच मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन विभाग आणि पोलीस विभागाने ही कारवाई केली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 439 दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट न घालता वाहन चालविल्या प्रकरणी 1 लक्ष 53 हजार रुपये, चारचाकी वाहनामध्ये वाहन चालवितांना 345 वाहन चालकांवर सिट बेल्ट न लावता वाहन चालविल्या प्रकरणी 64 हजार रुपये, 80 अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणी 3 लक्ष 19 हजार 500 रुपये, 224 ओव्हरलोड प्रकरणी 70 लक्ष 72 हजार रुपये, 32 स्कुल बसेसवर कारवाई प्रकरणी 3 लक्ष 12 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर 217 अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई करण्यात आली. परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुध्द व दोषी वाहनाविरुध्द एकूण 1337 प्रकरणात 79 लक्ष 21 हजार रुपये दंड वसूल केला.

पोलीस विभागाच्या जिल्हा वाहतूक शाखेने 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 35 हजार 269 प्रकरणात 74 लक्ष 98 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला. यामध्ये हेल्मेटच्या 178 कारवाईत 89 हजार रुपये, 1061 सिट बेल्ट प्रकरणात 2 लक्ष 12 हजार 200 रुपये आणि 34 हजार 30 अवैध प्रवासी वाहतूक प्रकरणात 71 लक्ष 97 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरुच राहणार असून नागरीकांनी वाहन चालवितांना वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.   

Post a Comment

0 Comments