वाशिम - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे यांच्या जयंती निमित्त भाजपा भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या पश्चिम विदर्भ संयोजिका तथा वाशिम जिल्हा प्रभारी डॉ. जयश्री गुट्टे यांच्या पुढाकारातुन सोमवार, १२ डिसेंबर रोजी रेल्वेस्टेशन परिसर व शहरात इतरत्र पाल ठोकून वास्तव्यास असलेल्या गरजुंना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत अचानक मिळालेल्या या भेटीमुळे या गरजुंना मायेची ऊब मिळाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, विदर्भ प्रभारी अशोक चोरमले, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आ. डॉ. सौ. उज्वलाताई हाके, विदर्भ संयोजीका सौ. रश्मी जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोस्ट कार्यालयनजीक भाजपा भटक्या विमुक्त महिला आघाडी कार्यालयात जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयश्री गुट्टे ह्या होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजप भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई फुके, भाजपा युवती जिल्हाध्यक्षा सोनाली गर्जे, सरचिटणीस राधाताई नकले, जया येळणे, निखिल सदावर्ते, पंकज गिते, संतोष घुगे, दत्ता केंद्रे, रवि खडसे, गोवर्धन ठाकरे, सचिन राठोड, शोभा धवसे यांची उपस्थिती होती. प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहीली.
त्यानंतर शहरातील रेल्वेस्टेशन, पोलीस स्टेशन, पोस्ट कार्यालय, बालाजी मंदिर आदी ठिकाणी पाल ठोकून राहत असलेल्या निर्धन कुटुंबातील महिला, पुरुष व बालकांना डॉ. जयश्री गुट्टे यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत मिळालेल्या या भेटीमुळे पालावरील महिला व पुरुषांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.
0 Comments