Ticker

6/recent/ticker-posts

"अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या उत्तर महाराष्ट्र सचिव व सामाजिक कार्यकर्त्या सौ.जोशिलाताई पगारीया यांचा अभीष्टचिंतन सोहळा संपन्न...!!!


साक्री ( प्रतिनिधी ) : दि.१४ ~ शिव - फुले - शाहु - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्या पत्रकार व अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या उत्तर महाराष्ट्र सचिव सौ.जोशिलाताई पगारिया यांचा अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात पांडव लाॅन्स साक्री या ठीकाणी अआनि समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली तर मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, बिल्डर पवनदादा मोरे, प्रदेश उपाध्यक्षा प्रेमलताताई जाधव,  वसंतराव वाघ, नाशिक जिल्हाध्यक्ष संजयबाबा गायकवाड, नाशिक जिल्हा संघटक प्रदीप पगारे, धुळे जिल्हाध्यक्षा शोभाताई नगराळे, एँड. मधुमती ठाणगे, महेश पाटील, मोनिका शिंपी,  संगिता पाटील, उज्ज्वला पगारे, सोनाली जैन, गीतांजली कोळी, अलका कापुरे आदींच्या उपस्थितीत खेळीमेळीत संपन्न झाला. या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवानिवृत्त जवानांचा व पत्रकार, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा कोविड योध्दा पुरस्कार देवुन मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला. 
या प्रसंगी सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थितीत होत्या. शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments