कारंजा : सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव (देव) पर्यंतची, माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा दि. १ जानेवारी २०२३ रोजी निघणार असून, यंदा कोरोनाचे सावट संपल्यामुळे सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण असून, माऊली दर्शनाने कारंजेकर नववर्षाचा प्रारंभ करणार आहेत.
तरी जास्तित जास्त वारकर्यांनी पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक सुरेश भाऊराव गढवाले यांनी केले आहे . याबाबत अधिक वृत्त असे की, सुमारे बारा वर्षापूर्वी सन २०११ मध्ये, माऊलीचे सद्भक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले, सुनिल गुंठेवार, भगवानदास खेमवाणी, हभप संजय महाराज कडोळे, सुनिल माकृवार, संकेत, राम गटागट, राजाभाऊ शेळके अरविंद गुंठेवार व इतरांनी एकत्र येत माऊली सेवा समिती स्थापन करून, श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पर्यंत, पालखी पदयात्रा सुरु केलेली होती. पहिल्या वर्षी केवळ सतरा वारकर्यांना सोबत घेऊन निघालेल्या रोपटयाचे सन २०२० पर्यंत वटवृक्षात रूपांतर झाले होते. आजमितीला या पदयात्रेत अडीच ते तिन हजार वारकरी सहभागी होत असतात. मध्यंतरी गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने कहर केल्यामुळे पदयात्रेत खंड पडण्याची भिती वाटत असतांना सुध्दा माऊली सेवा समितीच्या वारकर्यांनी सुरु केलेली पालखी पदयात्रा खंडीत न होऊ देता निवडक वारकरी घेऊन, प्रशासनाच्या अनुमतीने सुरुच ठेवली होती . हे विशेष ! यंदा मात्र जल्लोषात,पहाडपुरा कारंजा येथून माऊली सेवा समितीची पालखी पदयात्रा रविवार दि १ जानेवारी रोजी, सकाळी ८ : ३० वाजता धामणगाव ( देव) करीता पायदळ निघणार असून, प्रमुख मार्गाने, संत नामदेव महाराज मंदिर, अमोल गढवाले यांचे निवास कुंभारपूरा मार्गाने, दारव्हा वेसी मधून गावा बाहेर पडून, धामणगाव देव करीता रवाना होईल. मार्गात सोमठाणा, सांगवी रेल्वे, श्रीसिद्ध रामनाथ महाराज मठ संस्थान,रामगाव रामेश्वर हून बोदेगाव येथे जाईल . बोदेगाव येथे, माऊलीचे सदभक्त - गजानन सुपलकर (गोंधळी) यांचे कडून भोजन व्यवस्था करण्यात आलेली असून त्यानंतर श्री मुंगसाजी महाराज संस्थान धामणगाव देव येथे दर्शन व आरती नंतर पदयात्रेचा समारोप होईल. तसेच दुसरे दिवशी दि. २ जानेवारी २०२३ रोजी,सुरेश गढवाले यांचेकडून सर्व वारकरी मंडळी करीता महाप्रसाद करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भजनी मंडळे व भजनी दिंड्या घेऊन, वारकरी मंडळीनी सहभागी होण्याचे आवाहन माऊली सेवा समितिचे योगेश गढवाले,सुनिल गुंठेवार, संतोष माकृवार, भगवान दास खेमवाणी, माजी नगरसेवक नितीन गढवाले, संदिप गढवाले, रुपेश गढवाले, विजय पाटीत खंडार, उमेश अनासाने,हभप संजय महाराज कडोळे यांनी केले आहे.
0 Comments