👍 आपला शेती, व्यवसाय सांभाळत असताना समाजकार्याची आवड असलेले शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे खदे समर्थक मनोज तायडे विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून आपले समाजकार्या आपल्या तरुण वयापासून गेल्या ५० वर्षापासून करीत आहे.शेती, युवक, महिला, बेरोजगार, , सेंद्रिय शेती, शेतकरी बचत गट शेतकरी कंपन्या आदि विविध विषयाला धरून त्यांनी अनेक कामे केली आहे. समाजकारण-राजकारण करीत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारे भेदभाव पहालेला नाही. तरुण वयापासूनच समाज
कार्याला त्यांनी सुरुवात केली असून आजतागायत त्यांचे हे कार्य सातत्याने सय्यमाने चालू आहे. शेतकरी संघटना, नागरिक मंच, शेतकरी जागर मंच विदर्भ जनआंदोलन निशांत पतसंस्था, पाणी वाटप संस्था आदी अनेक संघटनेच्या व संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामाचा मोठ्याप्रमाणात झपाटा लावला होता .त्या माध्यमातून अनेक शेतकरी युवक महिला नागरिक शेतकरी संघटनेशी जोडून त्या माध्यमातून अनेक मोठमोठे कामे पार पाडली आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्था संघटनेच्यावतीने सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्याच बरोबर शेतकरी संघटनेच्या चळवळीशी जुळून गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब मजुरांसाठी काम करीत आहे. शेतकरी जागर मंच, ,माहितीचा अधिकार, ग्रामसभा, रॉकेल गॅस संबंधित कायदा, रेशनिंगच्या बाबत कायदा ,दारूबंदीचा कायदा शेतकरी कायदा अनेक कायद्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने उपोषणे मोर्चे केलेले आहेत. नागरिक मंच चा माध्यमातून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांसाठी मोठी एक चळवळ उभी केली होती त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडून त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. शेतकरी संघटनेचे शरद जोशी सोबत जुळून त्यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करून अनेक आंदोलने, कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करून ग्रामीण भागात शेतकरी चळवळ मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत . गावा, गावामध्ये असलेला शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न थांबवण्यासाठी गाव तेथे शेतकरी संघटना समिती, नागरिक मंच, शेतकरी जागर मंच समितीची शाखा स्थापन करून, लोकांमध्ये सभा घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण केलेला आहे. शेतकरी जागर मंच या माध्यमातून शेतकरी व मजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने ते कार्य करीत आहेत. अकोला मध्ये पार पडलेल्या दोन्ही कासोदा परिषदेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना त्यांना अनेक वेळा जेल मध्ये सुद्धा जावे लागले. मी सुरू केलेले अण्णा हजारे साठीच्या उपोषणात त्यांनी सक्रियपणे माझ्यासोबत त्यांनी गांधी जवाहर बाग अकोला येथे नऊ दिवस माझ्या आमरण उपोषण ला पाठिंबा देऊन सहकार्य केले तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. धरणे, मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको आंदोलन, आदी विविध आंदोलने करून त्यांनी शासनावर दबाव आणून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. तरुण वयात शेतकरी संघटने सोबत जोडले व काम केलेले आहे. तर आता शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून धडाडीने काम करीत आहेत. अशा या धडपड्या तरुणांनाही लाजवणाऱ्या सामाजिक भान असलेल्या मनोज तायडे पाटील राहणार कौलखेड यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन . तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार लाख.पुढील सामाजिक व राजकीय प्रगतीसाठी त्यांना मनापासून लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. भाऊ तुम जियो हजारो साल साल के दिन हो लाखो हजार. माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले काही वाईट. काही कधीच लक्षात न राहणारे ,आणि काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली ,त्यातलेच एक तुम्ही. म्हणूनच भाऊ व्यक्तिमत्व आपका ,शान है हमारी ,कर्तुत्व आपका ,पहचान है हमारी, हिफाजत करना है जिंदगी की, क्युकी सासे आपकी जान है हमारी भाऊचा नंबर..९८५००९३९५३ आपला स्नेही मित्र
गजानन ओंकार हरणे, समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन , खडकी अकोला. मोबाईल नंबर 🚩९८२२९४२६२३. 🙏👍.
0 Comments