अवैध धंद्यावर सतत कारवाया करत त्यावर अंकुश ठेवत समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित
राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सातत्याने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरु आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सर्पानि भारत लसंते, यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करत तब्बल २३.२५,०१५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, पो.स्टे. वाशिम ग्रामीण हद्दीतील राजगाव फाट्यावरील अण्णाजी धाव्याच्या बाजूला असलेल्या टीनशेडमध्ये पैश्यांच्या हारजीतचा जुगार खेळत असलेल्या इसमांवर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४७.१९५/- रुपये नगदी, १२ मोबाईल संच अंदाजे किंमत ७२.२००/- रुपये, घटनास्थळावरून नगदी ९.५२०/- रुपये व ०७ मोबाईल संच अंदाजे किंमत ३६,०००/- रुपय ४६ मोटारसायकली किंमत अंदाजे १७,४५,०००/- रुपये, एक टाटा सफारी कार किंमत अंदाजे ४,००,०००/- रुपये व जुगार साहित्य ताशपत्ते अंदाजे किंमत रुपये १००/- असा एकूण २३.२५,०१५/- रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
त्याचबरोबर सपोनि. प्रमोद इंगळे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने शेलूबाजार,
ता. मंगरुळपीर, जि.वाशिम येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ०५ आरोपीसह ५.५३०/- रुपयांचा
मुद्देमाल जप्त केला. तर सपोनि अतुल मोहनकर, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने महात्मा फुले
मार्केट, वाशिम येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून ०६ आरोपींसह ५.८७०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
केला. अशाप्रकार ०३ कारवायांमध्ये एकूण २८ आरोपींवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण २३.३६
लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, सपोनि. भारत लसंते, सपोनि अतुल मोहनकर, सपोनि. प्रमोद इंगळे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांनी अवैध धंद्यांबाबतची गोपनीय माहिती नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL 112 यांना द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments