Ticker

6/recent/ticker-posts

लव्ह जिहाद नियंत्रण कायदा निर्मितीसाठी लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंडचे, एस.डी. ओ. यांना निवेदन

----------------------------------------
मंगरूळनाथ :
              सर्वत्र लव्ह जिहाचा हैदोस वाढला असून यात हिंदू मुलींना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न मोठ्मा प्रमाणात होत आहे . असल्या प्रकरणांमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे . ही भीती व या दुष्टचक्रातून मुली आणि त्यांचे पालक यांना बाहेर काढण्यासाठी  तसेच या अश्लाघ्य प्रकाराला आळा घालण्यासाठी ' लव्ह जिहाद नियंत्रण कायदा बनवण्यात यावा याकरिता लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड या सामाजिक संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे . 
            यावेळी निवेदन देताना  किशोर घोडचर , संजूभाऊ टोंचर , विलासराव पवार , गंगाधर कांबळे , विठ्ठलपंत रनबालळे , पवन भालेराव , श्यामभाऊ खोडे यांचा प्रमुख सहभाग होता . या कार्याला अधिक गतीप्राप्त करून देण्यासाठी जिल्हाभर अशीच निवेदने देण्यात आली पाहिजे म्हणून ' निवेदन अभियान ' राबवून त्याव्दारे जनतेला व विविध सामाजिक संघटनांना आवाहन करण्यात येणार असल्याचे ' लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड ' या संघटनेकडून कळविण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments