मंगरुळपिर (ता. प्र.)
तालुक्यातील शेलुबाजार येथील श्रीमती सरस्वती बाई राऊत इंग्लिश शाळेत पालक सभा , कलाकृती व विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक उद्धवजी राऊत सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शितल राऊत व स्मिता बारड यांनी स्थान भूषविले तसेच पालक पिता प्रतिनिधी म्हणून गंगादीप राऊत व त्याचबरोबर पालक माता प्रतिनिधी म्हणून डॉ. आडोळे मॅडम यांनी उपस्थिती दाखविली
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पालक पिता प्रतिनिधी म्हणून लाभलेले गंगाधर राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालक माता प्रतिनिधी म्हणून लाभलेल्या डॉ. आडोळे मॅडम यांनी सुद्धा आपले विचार सगळ्यांसमोर प्रकट केले. त्यांनी मुलांचा विकास हा गुणांमुळे नाही तर त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यामुळे होते आणि पालकांनी मुलांच्या कौशल्य विकास वाढवा यावर भर द्यावा असे मनोगत व्यक्त केले. तसेच आणखी काही पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा याकरिता शाळेत कलाकृती प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व याचबरोबर यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला व आपली कला कौशल्याचे प्रदर्शन केले.
शाळेचे संचालक उद्धवजी राऊत यांनी सुद्धा पालकांसमोर आपले विचार मांडले.पालकांनी कुठल्याही मुलांना कमी लेखू नये प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे टॅलेंट असते आणि तो टॅलेंट बाहेर पडावा याकरिता आम्ही शाळेमध्ये कलाकृती व विज्ञान प्रदर्शनी राबवली आहे आणि त्याचबरोबर आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे आणि मुलांना तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याचे ज्ञान आहे असे मनोगत शाळेचे संचालक राऊत सर यांनी व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा याकरिता तर विज्ञान प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करण्यात आले. यामध्ये कलाकृती प्रदर्शनी साठीचे विषय पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात आले.
कार्डबोर्डच्या पेपर पासून साधे एटीएम मशीन बनवणे ,किल्ले बनविणे, बैलगाडीचे मॉडेल बनविणे, कार्डबोर्ड पासून शाळेचे मॉडेल बनवणे, आईस्क्रीम स्टिक पासून फ्लावर पॉट व घर बनवणे, व तसेच कार्डबोर्ड पासून टेबल लॅम्प बनवणे व विज्ञान प्रदर्शनीचे विषय पुढील प्रमाणे
1) Air absorbers container
2)watercycle
3) satelight comunication
4) solar system
5) drip iregation
6) collect tank
या कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पिल्लेवार यांनी केले, प्रास्ताविक चंचल येवले यांनी केले तर आभार शोएब खान यांनी केले.
0 Comments