Ticker

6/recent/ticker-posts

थर्टी फस्ट व नववर्ष’ स्वागतास वाशिम पोलीस दल सज्ज.


                     
दि.३१.१२.२०२२ रोजी थर्टी फस्ट निमित्ताने नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. विशेषतः तरुण मंडळी मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत मद्यपान करून उत्सव साजरा करतात.
     त्या अनुषंगाने थर्टी फस्ट व नववर्ष स्वागत बंदोबस्ताकरिता जिल्हा पोलीस आस्थापनेवरील ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ७१ सहा.पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, ७०० पुरुष व महिला पोलीस अंमलदार असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह हे स्वतः संपूर्ण बंदोबस्तावर देखरेख करत आहेत. सदर दिवशी मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करने संबंधाने जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
     वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, थर्टी फस्ट व नववर्ष स्वागतनिमित्ताने पूर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणतेही कार्यक्रम साजरे करू नये. शांतता भंग होईल असे कृत्य करू नये तसेच भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालवून स्वतःचे व इतरांचे जीवित्वास धोका निर्माण करू नये, ध्वनी प्रदूषण संबंधाने मा.सर्वोच्च व मा.उच्च न्यायालयांचे निर्देश व ध्वनी प्रदूषण अधिनियम – २००० तसेच पर्यावरण संवर्धन अधिनियम – १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
     नागरिकांनी थर्टी फस्ट व नववर्ष स्वागत बंदोबस्त अनुषंगाने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व काही आक्षेपार्ह घटनेची माहिती प्राप्त झाल्यास नियंत्रण कक्ष, वाशिम किंवा DIAL 112 ला संपर्क करावा. सर्व नागरिकांना वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे नव – वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.



        (प्रवीण धुमाळ)
  पोलीस निरीक्षक, जि.वि.शा.
पोलीस अधिक्षक, वाशिम करिता



Post a Comment

0 Comments