वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय मंगरूळपिर, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. सदर मागणी शासन दरबारी प्रलंबित असल्याने मंगरूळपीर तालुक्यात लोकसंख्या एक लाखाचे वर असून आरोग्य व्यवस्था फार दयनीय आहे. रात्री नऊ नंतर कुठल्याही प्रकारची आरोग्यविषयक आपातकालीन सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ग्रामीण रुग्णालय मंगरूळपिर येथे गोरगरीब जनतेचा प्रामुख्याने कल आहे. आणि रुग्ण गरीब असो वा श्रीमंत रात्रीच्या वेळी आपत्कालीन परिस्थिति मध्ये एकच रुग्णालय मदतगार ठरते ते म्हणजे आपला सर्वांचा हक्काचा सरकारी दवाखाना म्हणजेच ग्रामीण रुग्णालय मंगरुळ पीर या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता नाही.परंतु विषप्राशन सर्पदंष या सारखे कठीण विषय देखील येथील डॉक्टर मंडळी फार शिताफिने हाताळतात यात शंका नाही. परंतु कलाकार किती ही योग्य असला तरी त्यास कला दाखविण्यासाठी योग्य त्या साधनांची आवश्यकता असते. ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही.
या रुग्णालयात व्यवस्थांचा अभाव असल्याचे पाहायला मिळते. तसेच तालुक्यातून शेकडोच्या वर रुग्ण दर आठवड्याला डायलिसिस साठी बाहेरच्या रुग्णालया मध्ये जात असतात बहुतांश लोकांची परिस्थिति ही गरिबीची असल्यामुळे त्यांना अतिशय कठीण प्रसंगातून जात आपल्या रुग्णाची सेवा करावी लागते. आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करीत आहोत व हे असताना अशा ठिकाणी अशा पद्धतीची जर रुग्णाची हेळसांड होत असेल तर ही गोष्ट अशोभनीय आहे. मंगरूळपिर तालुका हा कारंजा तालुका, मानोरा तालुका, वाशिम तालुका व अकोला जिल्हा यांच्या मध्यभागी येतो. येथून दोन मोठे हायवे गेल्यामुळे येथे एक्सीडेंट चे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आपल्या कार्यालयाकडून मला योग्य ते उत्तर न मिळाल्यास नाईलाजास्तव या मागणीसाठी मला आंदोलनावर बसावे लागेल, प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही या आंदोलनावर बसलो तर यामुळे सरकारची बदनामी होईल व सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होतील, त्यामुळे आपणास योग्य तो तोडगा काढून या ठिकाणी आवश्यक ते निर्देश द्यावे व मंगरुळपर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी वीनंती भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमीत मुंढरे तथा सागर गुल्हाने शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, तथा ऋशीकेश देशमुख, आकाश चौधरी आणी यांच्या चमुने विनंती केली आहे.
0 Comments