Ticker

6/recent/ticker-posts

श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना+ 2 दत्तक ग्राम चेहेल येथे पथकाला निरोप समारंभ


       - मंगरूळपीर येथून पाच किलोमीटर अंतरावर चेहेल  गावामध्ये विशेष शिबिराचे आयोजन केले होते ते दि. 24/12/2022 शनिवार ते दि. 31/12/2022 शनिवार पर्यंत विशेष होते दि. 31/12/2022 शनिवारला निरोप समारंभ देण्यात आला.
    राष्ट्रीय सेवा योजने मुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास शक्य ---
    निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अमर शिक्षण प्रसारक संस्था चे अध्यक्ष  आ.अ. राठोड साहेब हे लाभले. त्यांच्या हातून संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर प्रमुख अतिथी म्हणून , पी .पी. इंगोले सर कोषाध्यक्ष, कार्यकारी प्राचार्य डॉ सुनील राठोड,  जितेंद्र नारायण राऊत नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत चेहेल,  सुनील कैलास चौधरी पोलीस पाटील,  विनोद निराकार चौधरी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य,  सुधाकर शेषराव चौधरी वाशिम खबर चे संपादक,   विनोद  राठोड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,  शंकर मधुकर चौधरी प्रतिष्ठित नागरिक,  साहेबराव  वंजारे ग्राम, रोजगार से दत्तात्रय चौधरी ग्रामपंचायत कर्मचारी, दिनेश भाऊ चौधरी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रा. पी. एन. जाधव सर, प्रा. डी. बी. जाधव , डॉ.व्हि.डि. कोवे, प्रा. प्रकाश शृंगारे, प्रा. डॉ. डी.जी राठोड, प्रा. डॉ. आयाज खान, प्रा. डॉ. सीमा रघुवंशी मॅडम, प्रा. चापके मॅडम, व स्वयंसेवक व गावकरी मंडळी यांच्या उपस्थिती विशेष पथकाला निरोप समारंभ देण्यात आला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गायत्री सुनील पवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे निर्भय विनोद राठोड यांनी केले.
     तसेच अध्यक्षाच्या आदेशाने व राष्ट्रगीताने निरोप समारंभाची सांगता झाली.-----

Post a Comment

0 Comments