Ticker

6/recent/ticker-posts

शेगांव , शिर्डी बससेवा सुरू निवेदनाला आले यश, सागर जऊळकर

       मंगरूळपीर ते शेगांव व  
        शिर्डी ही  बससेवा सुरु 

मंगरूळपीर : 

मंगरूळपीर आगारातून प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली मंगरूळपीर ते शेगांव व मंगरुळपीर ते शिर्डी ही  बससेवा सुरु होती परंतू कोरोना काळात लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या होत्या तेव्हा पासून आजपर्यंत सुरु न केलेली ह्या दोन्ही तिर्थक्षेत्राशी जोडणारी बससेवा बंद असल्याने जनसामान्यांचे  तसेच रुग्णांचे हाल होत असल्याने ही बाब लक्षात येताच तत्परतेने   सागर जऊळकर उपशहरप्रमुख शिवसेना ( बाळासाहेबांची ) यांचे नेतृत्वात राजकुमार मनवर, योगीराज इंगोले, वैभव ठाकरे, योगेश खडसे, रवी मोरे यांनी आज बुधवार रोजी निवेदन आगार प्रमुख महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार मंगरूळपीर यांना देऊन मंगरुळपीर ते शेगांव व मंगरूळपीर ते शिर्डी एस.टी ची बस सेवा पूर्वव्रत करावी अशी मागणी करण्यात आली होती मंगरूळपीर आगाराने या सर्व बाबींचा विचार करून तात्काळ बस सेवा सुरू केली या बस सेवेला हार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी आघाराचे आभार मानत धन्यवाद दिले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


Post a Comment

0 Comments