मंगरूळपीर येथील जयंती सोहळ्यामध्ये सर्वच आंबेडकर नगर मधील उपासक उपासिका उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी आपले विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांनी खूप त्रास सहन करून महिलांसाठी पहिली शाळा काढलीं म्हणून आपण आज चांगले शिक्षण घेत आहोत. सावित्रीबाई फुले यांची महिलांवर खूप उपकार आहेत त्यांच्या उपकाराची भेट म्हणून आपण पण त्यांच्या विचारावर पाऊल टाकून समोर गेले पाहिजे आणि त्यांनी आपल्याला जे शिकवलं त्या शिक्षणाचा धडा घेऊन आपल्या घरातील मुली बाळांना शिकवले पाहिजे आणि त्यांना मोठ्या पोस्टवर पाठविले पाहिजे तरच सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित स्त्री म्हणजे आजची असलेली कलेक्टर इंजिनियर त्यांचे स्वप्न आपण सर्वजणी पूर्ण करू अशी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर नगर मधील महिलांनी शपथ घेतली. छोट्या छोट्या मुलींनी वेशभूषा करून आपला सहभाग नोंदवला होता. आणि शेवटी आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक मोहोड मॅडम यांनी केले
_____________________________
0 Comments