- अध्यक्ष विक्रांत डोंगरे यांची घोषणा
अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये अपक्ष उमेदवार श्री श्याम जगमोहन प्रजापती यांना अंशकालीन पदवीधर संघटेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विक्रांत डोंगरे यांनी रविवारी (ता.22) पाठींबा जाहीर केला असून तसे पत्र त्यांनी श्याम प्रजापती यांना सुपूर्त केले. यासह पाचही जिल्ह्यातील पदाधीकाऱ्यांना त्यांनी कामाला लागण्याच्या सुचना केल्या आहेत. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारी रोजी होत असून 2 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार श्याम जगमोहन प्रजापती यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पाचही जिल्ह्यातील पदवीधरांचे त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. त्यातच आता अंशकालीन पदवीधर संघटेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विक्रांत डोंगरे यांनी प्रजापती यांच्या प्रमाणिक कार्याचे कौतूक करत त्यांना संघटनेचा पाठींबा जाहीर केला आहे. सोबतच संघटनेच्या सर्व मागण्यां प्रजापती यांनी मंजूर करत जाहीर नाम्यात प्रथम क्रमांकावर घेण्याचे आश्वास दिल्याने डोंगरे यांनी त्यांना पाठींबा दिला आहे. तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील संघटेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांना डोंगरे यांनी प्रजापती यांना निवडूण आणण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागण्याच्या सुचना केल्या आहेत. पाठींबा पत्र देताना संघटनेचे सल्लागार ॲड.सुधीर एच.तायडे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम मोहोड यांच्यासह अन्य पदाधीकारी उपस्थित होते.
0 Comments