अकोला ................................ स्थानिक शिवापूर येथील जय भवानी व्यायाम शाळेचे युवक विठ्ठल सारसे यांची राजधानी दिल्ली परेडसाठी गणतंत्र दिनी राजपथावर चालणाऱ्या थल सेनेच्या तुकडीतील परेड मध्ये निवड करण्यात आली आहे.अकोला शहरातील शिवापूर येथील जय भवानी व्यायाम शाळेचा वीर सुपुत्र विठ्ठल सुरेश सारसे यांची सातव्यांदा परेड मध्ये निवड झाली आहे .परेडमध्ये सातव्यांदा निवड होणारा विठ्ठल सारसे एकमेव जवान असून संपूर्ण जिल्हासह महाराष्ट्रराज्यासाठी हे गौरवास्पद बाब आहे .जय भवानी व्यायाम शाळेचा जुना जाणता हुशार विद्यार्थी आहे.हा शिवापूर छोट्याशा गावातून कठीण परिश्रम करून थल सेने पर्यंतचे यशस्वी शिखर गाठले आहे. 61 कॅवलरी हे युनिट राजपथावर 26 जानेवारी 2023 ला चालणार असून त्यात विठ्ठल सारसे यांची सातव्यांदा निवड करण्यात आली असून हे थलसेना 61 कॅवलरी दिल्ली येथे सेवा देत आहेत. ते आपल्या उल्लेखनीय कामगिरी चे श्रेय आदरणीय स्वर्गवासी बंडूभाऊ ढोरे तसेच जय भवानी व्यायाम शाळेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी केशवराव पातोंड , प्रल्हादराव ढोरे,वासुदेवराव ढोरे, निळोबा ढोरे, गजानन डोईफोडे ,पंजाब वानखडे, वैकुंठ ढोरे,शिवाजी चव्हाण,गणेश सारसे यांना दीले असून त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे. जिल्ह्यामध्ये विठ्ठल सारसे यांचे विविध सामाजिक, राजकीय सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याच्या या कार्याला अनेकानी त्यांच्या या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
🚩 🚩
गजानन हरणे, खडकी अकोला.
0 Comments