Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपिर तालुक्यात नव्या अवैध व्यापाराचा उगम.


मंगरूळपिर/बाळु काळे :- सध्या शहरी भागातील तरुण कशाचे व्यसन करतील हे सांगता येत नाही. शहरातील 18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांना कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. दारु, सिगारेट, गांजा.ताडी नंतर आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. संपूर्ण राज्यासह मंगरूळपिर शहरात या कुत्ता गोळीची नशा केली जात आहे. पोलीसांनी यावर मोठी कारवाई करत रॅकेट उद्धवस्त केले पाहिजे व कुत्ता गोळी च्या नशेत झिंगाट तरूणाईचे भविष्य अबाधित राखण्यासाठी ठोस पाऊले उचलली गेली पाहिजे अशी मागणी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये कुत्ता गोळीचे पेव मोठ्या प्रमाणात फुटले आहे. त्याबाबत पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई देखील केली जात आहे. मात्र तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने सामाजिक संघटना आणि आरोग्य विभाग व पोलीसांनी याबाबत जनजागृती करत कुत्ता गोळीपासून दूर राहा याबाबत आवाहन केलं आहे. मात्र, दारूची नशा महागडी वाटत असल्याने अवघ्या काही पैशात रुपयांना मिळणारी कुत्ता गोळी नशेसाठी सोपी असल्याने तरुणाई आहारी जात आहे.
मंगरूळपिर शहरात गुंगीकारक औषधी गोळ्यांची अवैधरित्या विक्री होत असल्या बाबत अद्याप फार मोठी पोलीस कार्यवाही झाली नसल्याने या विक्रेत्यांना बळ मीळत असल्याचे बोलल्या जात आहे.कुत्ता गोळीचं वैद्कीय भाशेतील नाव अल्प्रलोजोम असं आहे. या गोळीच्या अतिसेवनामुळे शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. व्यसनी तरुण याचा वापर नशा येण्यासाठी करतात. या गोळीच्या सेवनाने थेट मेंदूवर परिणाम होतो. याच्या सेवनामुळे नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहते. ही गोळी एक उत्तेजक पदार्थ आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र, अनेक एजंट बेकायदेशीररीत्या सर्रासपणे या गोळीची विक्री करतात.तर शहरातील औषधांच्या दुकानातून सुद्धा याची काही प्रमाणात विक्री केली जाते.आजकाल औषध बाजारात एक नवीन औषध दाखल झाले आहे, ज्याचे नाव आहे "कुत्ता गोळी" किंवा "कुत्र्याची गोळी". वास्तविक या औषधाचे खरे नाव "अल्प्राझोलम" आहे जे 
मानसिक विकार किंवा निद्रानाशाची तक्रार करणाऱ्या रुग्णांना
अल्प प्रमाणात दिले जाते. मात्र आजकाल नशेसाठी या औषधाचा वापर वाढत आहे. याबाबत मात्र अन्न औषध विभाग अनभिन्न आहे.या बाबत पोलीस विभागाने तातडीने कार्यवाही करत बेभान नषेत बुडणाऱ्या तरूनाईचे भविष्य व जिव वाचवावा,अशी मागणी जोर धरू लागली आहे.


ही गोळी खाल्ल्यानंतर माणसाचे शरीर सुन्न होते आणि त्यानंतर त्याला वेदना होत नाहीत. या टॅब्लेटच्या रसायनांचा मेंदूच्या पेशींवर थेट परिणाम होतो आणि एखाद्या व्यक्तीला झोप येऊ लागते, परंतु गोळी खाल्ल्यानंतर जर त्याला झोप येत नसेल तर ती व्यक्ती आपला स्वभाव गमावून रागाच्या भरात कोणतीही घटना घडवू शकते. तज्ञांच्या मते, डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय या गोळीचे सेवन करणे खूप धोकादायक आहे आणि यामुळे दीर्घकाळापर्यंत एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन देखील बिघडू शकते. अतिसेवनामुळे ब्रेन ट्यूमर किंवा स्ट्रोकसारखे घातक आजारही होऊ शकतात.


स्वस्त दरामुळे लहान शहरे आणि ग्रामीण भागात या टॅबलेटची मागणी खूप जास्त होत असल्याने आता मात्र यांची मागणी वाढत असल्याने आता त्याची किंमतही वाढत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकेकाळी 20 रुपये प्रति गोळी असलेली पट्टी आता 150 ते 250 रुपयांना विकली जाते. "अल्प्राझोलम" हे शेड्यूल वन श्रेणीतील औषध आहे जे कोणताही वैद्यकीय विक्रेता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू शकत नाही, अशा परिस्थितीत एजन्सींनी वैद्यकीय विक्रेत्यांना देखील इशारा दिला आहे. तरी मात्र छुप्या मार्गाने ह्या गोळ्यांची तस्करी ही एक गंभीर समस्या असे वैद्यकीय तज्ञांचे मत.



कोणत्याही टॅब्लेट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक असते. मेंदुशी संबंधित औषधे असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. अनावश्यक पद्धतीने औषधे घेतल्यास शरीरास त्याची सवय लागते. मग हळूहळू औषधांची मात्रा वाढविल्याशिवाय पर्याय नसतो. नशेखोरीमध्ये हेच होते. कोणत्याही कारणास्तव अशा औषधांचा वापर थांबला की त्या व्यक्तीला अस्पष्ट दिसणे, आत्मविश्वास कमी होणे एवढेच नव्हे तर फिट्स येणे असे प्रकार घडू शकतात.


कुत्ता गोळीचा प्रवास नेमका कुठून झाला, याची उकल अद्याप झालेली नसली तरी नशेचा हा नवा बाजार असल्याचा हा प्रकार आहे. या टॅब्लेट मध्य प्रदेशसह इतर काही ठिकाणांहून मागविण्यात येत असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला स्वस्त वाटणाऱ्या या टॅब्लट्सची मागणी वाढली की तस्कर त्या चढ्या भावाने खरेदीदारास देतात.कुत्र्याच्या गोळ्या औषध म्हणून वापरल्या जातात आणि काही समाजकंटकांनी नशेसाठी त्याचा वापर सुरू केला आहे. किंवा गोळ्यांमध्ये उत्तेजक रसायन मिसळले जाते, ज्यामुळे आरोग्य घातक ठरते. किंवा गोळ्या घेतल्याने संपूर्ण शरीर बधिर झाले असते. अंगदुखी जाणवत नाही. किंवा गोळ्या खाऊन बेशुद्ध झाले असते आणि अशी व्यक्ती कोणतेही कृत्य करण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही.


यामागे मोठे रॅकेट असण्याचा कयास व्यक्त होत आहे. अगदी स्वस्तात एक गोळी मिळत असल्याने स्वस्तात तरुण या नशेच्या आहारी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ०.२५ आणि ०.५० या दोन स्वरूपात या गोळ्या उपलब्ध असून, शेड्युल वन या कॅटेगरीत येत असल्याने त्यांची विक्री करताना विक्रेत्यांना काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या देता येत नाही. मात्र, नशेसाठी वापरण्यात येणारी इतरही बरीच औषधे असून, त्यातून मोठी उलाढाल होते आहे. बापरे बाप कुठे चालला आहात तरुण

Post a Comment

0 Comments