मंगरूळपीर रक्तदान शिबिर
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीचे औचित्य साधून संत गाडगे महाराज प्राथमिक मराठी शाळा, मंगलधाम परिसर, मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजेश भारस्कर मित्र परिवाराचे वतीने करण्यात आले होते.रक्तदान शिबिरात प्रथम आर एम बोन्डे (नायब तहसीलदार)यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सुनील हूड(ठाणेदार, मं. पीर) हिरालाल जांभुळकर(उपकार्यकारी अभियंता महावितरण)सुनिल मालपाणी (शांतता कमिटी सदस्य)डॉ. अनिल बुरे, हिरामण इंगोले(अध्यक्ष)श्रीमती विद्याबाई भारस्कर, डॉ. यच यस मुंडे, सतीश हिवरकर (जिल्हामंत्री)यांचेहस्ते जयंती पुरुषांचे प्रतिमेचे पूजन व हार्रार्पण करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात राजेश भारस्कर यांनी आपला मित्र अथवा नातेवाईक देशविदेशात अथवा कुठेही असेल तरी आपण त्याला मोबाईलचे माध्यमातून बघू शकतो, बोलू शकतो एवढी प्रगती विज्ञानने केली असली तरी रक्त बनविण्यात मात्र यश आलेले नाही ते फक्त मानवाच्या शरीरातच बनते म्हणून रक्तदान करणे व इतरांकडून करवून घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. त्यानंतर रक्तदानाविषयी व थोर पुरुषांविषयी सुरज कोंगे (इले. इंजिनिअर)गौरव इंगळे(सर्पमित्र)श्रीमती प्रतिभा डवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर नायब तहसीलदार यांनी सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शिबिरामधे राजेश भारस्कर,डॉ. अनिल बुरे,गोपाल पांडे, सतीश टेटवार,योगेश गवई, संजय करपे, संतोष भगत, पंकज इंगोले, प्रमोद भेंडेकर, रवि गरकड यांचेसह इतरांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले. कार्यक्रमाचे संचालन जी. व्ही. भारस्कर यांनी तर आभार प्रदर्शन गवई सर यांनी केले. कार्यक्रमास संतोष शेटे,राजिव भेंडेकर,विजेंद्र गुप्ता,पुंडलिक गादेकर, कैलास भुसारे, राहुल रघुवंशी, राजकुमार ठाकूर,मुसळे सर, उखळकर सर, दत्ताजी महल्ले, संदीप भगत, वैभव कोपरकर,आकाश भेंडेकर,ससाणे सर,दबडे सर,अमोल घोडे,डॉ. विनोद इंगळे,दिपक विटकरे,शंतनू ठाकूर,प्रकाश गुप्ता आदी हजर होते. याप्रसंगी
जीवन अमृत शासकीय रक्तपेढी सामान्य रुग्णालयचे डॉ. एच एस मुंडे,एस बी मोरे, सी वासनिक, एस के दंदे,ऐ डी इंगळे,यल यू काळे, एस ढोके यांनी रक्त संकलन केले.
0 Comments