अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे निवडणूक रिंगणात आहेत. याच धीरज लिंगाडेंसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षरश: जीवाचे रान करीत आहेत. मात्र, काँग्रेसचे 'आयात' उमेदवार धीरज लिंगाडेंनी काँग्रेसवरच उलटत आपण किती 'कृतघ्न' आहोत याचा पुरावाच अगदी सुरूवातीला दिला आहे. धीरज लिंगाडे हे काँग्रेसबद्दल अतिशय खालच्या पातळीवर बोलतात. काँग्रेस ही बोगस आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना 'मॅनेज्ड' आहेत. ज्यांच्या उमेदवारीची काँग्रेसकडून कायम चर्चा होती ते अकोल्याचे काँग्रेसनेते डॉ. सुधीर ढोणे यांच्याबद्दलही लिंगाडे अतिशय वादग्रस्त बोलतात.
ज्या पक्षानं स्वत:च्या पक्षातील निष्ठावंतांना दूर ठेवत दुसर्या पक्षातून लिंगाडेंना आयात करीत उमेदवारी दिली त्या पक्षावरच लिंगाडे उलटले आहेत. आजच या माणसानं आपला 'ज्या घरात खायचं, त्याच घराचे वासे मोजायचे' हा विश्वासघातकी कृतघ्नपणाचा गुणधर्म दाखवून दिला आहे. लिंगाडेंनी त्यांच्या विजयासाठी जीवाचं रान करणार्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. त्यामूळे अशा विश्वासघातकी माणसाला मदत करण्यापेक्षा श्याम जगमोहन प्रजापती हा सक्षम पर्याय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे आणि मतदारांकडे उपलब्ध आहे. त्यामूळे लिंगाडेंना मतदान करून आपलं मतदान वाया घालवू नका. डॉ. रणजीत पाटलांना पराभूत करण्याची ताकद फक्त श्याम जगमोहन प्रजापती मध्ये आहे. डॉ. रणजीत पाटलांसारख्याच कृतघ्न आणि स्वार्थी असलेल्या धीरज लिंगाडेंना त्यांची जागा दाखवत श्याम जगमोहन प्रजापती यांनाच पहिल्या पसंतीचं मत देत विजयी करा अन मतदारसंघात इतिहास घडवा.
0 Comments