मंगरूळपीर शासनाने वाजा गाजा करून मोठ्या थाटात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून जनतेला दिलासा दिला .
मात्र अवघ्या काही दिवसातच टोलवर रात्रंदिवस काम करणाऱ्यांची वेळे वर पगार मिळत नसल्यामुळे पोट भरण्याची सुद्धा वांदेवाडी होत आहे.
टोल वरील कर्मचाऱ्यांचे बेहाल सुरू झाले. FAST = GO INFRA RSIIL
या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे
मिळालेल्या सूत्राच्या माहिती नुसार मेस वाल्याचा पेमेंट वेळेवर मिळत नसल्यामुळे पाहिजे तसा जेवणाचा डबा या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. व आता पर्यंत केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा मिळाला नाही . या टोलवर काम करण्यासाठी बाहेर राज्यातून आणलेली कर्मचारी वर्ग असल्यामुळे होत असलेल्या समस्या सांगावं तरी कुणाला असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना झाला आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास मोठा बोभाटा होण्याची शक्यता आहे. भाकर देता का कोणी भाकर असा सवाल मात्र कर्मचाऱ्यात होत आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे या महामार्गाचे नाव आहे. आणि आज या महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत असतील तर काय म्हणावे लागेल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या कारकिर्दीत मात्र गरीब उपाशी राहिला नाही तर कर्मचारी कुठून राहील मुख्यमंत्री साहेब सखोल चौकशी करून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा असे जनसामान्यात बोलले जात आहे. काम करावं का सोडून जावं पगार मिळत नसल्यामुळे व वेळेवर जेवण सुद्धा मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यावर समस्येची टांगती तलवार दिसून येत आहे.
0 Comments