मंगरूळपीर येथील सेंटरवर शिवरात्री महोत्सव ब्रह्मा बाबा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ब्रह्माकुमारी सारिका दीदी, बीके। गौरी दीदी, यांच्या मार्गदर्शनाखाली
समाजसेवक पांडुरंग कोठाळे, मंगरूळपीर चे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुनीलजी हुड , सचिन सुर्वे, संतोष बियानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, केक कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले.
ब्रह्माकुमारी सारिका दीदी,
परमात्मा शिव आपणा सर्वांचे परमपिता आहेत. संपुर्ण विश्वात भारत सर्वात महान देश आहे. कारण याच भुमीवर परमात्म्याचे दिव्य अवतरण होते. माऊंट आबु (मधुबन) सर्वश्रेष्ठ तिर्थ स्थान आहे. हीच ती महान भुमी आहे जिथे परमात्म्याचे दिव्य अवतरण झाले आहे.
तुम सर्वांना हे जाणून आश्चर्य वाटेल की भगवान शिवाचे दिव्य अवतरण झाले आहे. लाखो मनुष्य आत्मे या ठिकाणी ईश्वरीय मिलनाचा सुखद अनुभव गेल्या ८७ वर्षापासुन घेत आहेत. परमात्मा शिव यांना स्वतःचे शरीर नाही. ते निराकार ज्योतिबिंदु स्वरुप आहेत. त्यामुळे ते प्रजापिता ब्रह्माच्या ललाटी अवतरित होऊन मानवीय आत्म्यांना सहज राजयोग शिकवत आहेत. या सहज राजयोगाच्या आधारे लाखो लोकांनी आपले जीवन श्रेष्ठ बनविले आहे. ब्रह्माकुमारीज परिवार आपणा सर्वांना विनंती करतो की, या जगातील सर्वांत मोठे सत्य, परमात्मा अवतरणाचे सत्य जाणुन घ्या आणि त्यांच्या सोचत मिलनाचा सुखद सौभाग्यशाली अनुभव घ्या.
परमपिता परमात्मा शिव यांचे दिव्य अवतरण, त्यांचे कार्य, आणि नविन जगाची स्थापना या संबधी अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी जवळच्या ब्रह्माकुमारी सेवा केद्राशी संपर्क साधा.
मख्या या कलियुगाचा शेवटचा टप्पा सुरू आहे, हा संपूर्ण काळ, रात्र किंवा महारात्री आहे. आम्ही सर्व बंधू- भगिनींना हा शुभ संदेश देऊ इच्छितो की आता परमपिता परमात्मा शिव पुन्हा प्रजापिता ब्रह्माच्या शरीरात प्रवेश करून जगाला सुखी व संपन्न करण्यासाठी सहज राजयोग शिकवत आहेत. हे ज्ञान सर्वाना देने हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याचे फल मुक्ती व जीवन-मुक्ती मानले जाते. आता मानवाने सर्व विकारांशी असलेले नाते तोडून "परमात्मा शिवा सोबत नाते जोडले पाहिजे.
श्रीराम हे शिवाची पूजा करत
असत. रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी रामेश्वराची म्हणजेच शिवाची विधीवत पूजा करुन विजयासाठी वरदान प्राप्त केले. (रामेश्वर रामाचे ईश्वर)
आपण बघतो शंकर है
नेहमी ध्यानस्त दिसतात. समोर शिवाची पिंड दिसते. निराकार ज्योतिबिंदू स्वरुप परमात्म्याच्या सत्य स्वरुपावर ते ध्यान केंद्रीत करतात. ज्ञानरुपी तीसरा नेत्र त्यांना शिव परमात्म्याकडुन प्राप्त झाला आहे. म्हणुनच शंकाराचा तिसरा डोळा दाखवितात.
महाभारत युध्दापुर्वी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या मैदानात सर्वेश्वरराची म्हणजेच शिवाची स्थापना केली. त्यांनी स्वतः ही पुजा केली व पांडवांकडुनही पुजा करुन घेतली.
शिख धर्म स्थापक गुरुनानक देवजी यांनी म्हटले आहे तो निराकार आहे. म्हणजेच ज्योति स्वरूप आहे. एक ओंकार निराकार सतनाम. ते नेहमीच ज्योतिबिंदू परमात्म्याकडे वरच्या बाजुला बोट दाखवितात.
ख्रिस्त धर्म स्थापक येशु ख्रितांनी म्हटले आहे. ईश्वर प्रकाश स्वरुप आहे. मी ईश्वराचा पुत्र आहे. आजही चर्च मध्ये मोठी मेनबत्ती लावली जाते. जी परमप्रकाश परमात्म्याची निदर्शक (सूचक) आहे. छोटया मेनबत्या लावल्या जातात त्या आत्म्याच्या निदर्शक आहेत.
नूर-ए-इलाही म्हणजे तेज, तेजस्वी रुप, प्रकाशमय रुप. प्रकाशमय रुप व ज्योतिस्वरुप एकच आहेत. मक्का मदिनाला पवित्र दगडाचे दर्शन घेतात. त्यला संग - ए अस्वद असे म्हणतात. परमात्मा निराकार आहेत. त्याला शारीरिक रुप नाही म्हणुन ही प्रतिमा. अशा प्रकारे आपण बघतो की सर्वच धर्मांनी परमात्मा ज्योर्तिबिंदु स्वरुप, प्रकाश स्वरुप आहे हे सांगितले आहे.
भगवंताने म्हटले आहे माझा जन्म दिव्य आणि आलौकीक आहे. मी सूर्य चंद्र आणि तारे यांच्या पलिकडे असलेल्या परम निवास स्थानाचा निवासी आहे. प्रकृतीला वश करुन मी या जगात धर्माची स्थापना करण्यासाठी आणि अनेकदा गमावलेल्या ज्ञानाचे कथन करण्यासाठी आलो आहे. मुलांनो या ज्ञानाद्वारे माझ्यात मन लावा. मी तुम्हाला सर्व पापांपासुन मुक्त करेन व परमधाम मध्ये घेवुन जाईल जिथे तुम्ही परमशांतीचा अनुभव घ्याल.
जगातील सर्व महापुरुषांची, देवी देवतांची जयंती साजरी केली जाते परंतु शिव परमात्म्याची मात्र "महाशिवरात्रि" साजरी केली जाते. याचा अर्थ परमात्मा शिव हे मरण रहीत आहेत. त्यांचा गर्भामध्ये प्रवेश होऊन शारीरिक जन्म होत नाही. जेव्हा-जेव्हा या धरतीवर पापाचार, भ्रष्टाचार अतिकडे जातो. त्यालाचा अज्ञानाची घोर रात्र असे म्हटले आहे. अशा समयी परमात्मा शिव साधारण वृध्द तनामध्ये प्रवेश घेऊन त्यांचे नाव ब्रह्मा असे ठेवतात. व त्यांच्या द्वारे आम्हाला अंधारातुन प्रकाशाकडे घेऊन जातात.
महाशिवरात्रीचे वरील आध्यात्मिक रहस्य समजून घेऊन सण साजरा केला तर हा सण अधिक अर्थपूर्ण आणि फलदायी होईल,
नवीन सृष्टीचे हक्कदार होण्यासाठी ज्ञान, योग, धारणा, सेवा मार्गब्रह्माकुमारी सारिका दीदी बीके , गौरी दीदी, नीता दीदी , बबिता दीदी, हा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला शहरातील महिला व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती वृत्तसंकलन करण्याकरता, वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, पत्रकार माचलकर

0 Comments