Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

                              
" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा " राज्यगीताचे गायन
वाशिम दि.१९  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज १९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" राज्यगीताचे गायन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा सूचना अधिकारी सागर हवालदार,अधीक्षक राहुल वानखेडे,सहायक अधीक्षक सुनील घोडे,धर्मराज चव्हाण,सुमीत खडसे, आनंद आरु,सुवर्णा सुर्वे,शितल पावडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.

Post a Comment

0 Comments