Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. रोशन लाहोटी निस्वार्थ सेवाभावी

             डॉ. रोशन लाहोटी 
 
       आज मोठ्या प्रमाणात जग हे चंद्राला गवसनी करण्याकरिता झेप घेत आहेत व डिजिटल इंडिया म्हणून आगळीवेगळी छाप करणाऱ्या या देशात आजही समाजाप्रती असता असणारे. परोपकार व परमार्थ हीच मानवनिर्मित सेवा करणारे आज ही या पृथ्वीतलावर आहेत. परोपकार व परमार्थ करिताच  जन्माला येतात मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करत  सातत्याने झटत असतात. समाजाच्या कल्याणा करता निस्वार्थपणे  कार्य करतात कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी ची अपेक्षा न करता नाथ नगरीतील डॉ. रोशन लाहोटी निस्वार्थपणे सेवा करत असतात 
आज  दुपारचा प्रसंग त्यांच्या हॉस्पिटल मध्ये एक अनोळखी पेशंटवर कोणत्याही प्रकारची ओळख नसलेला खिशात एक रुपया ही नसणारा व्यक्तीवर उपचार करणे त्याचा दात काढून स्वतःच्या जवळच्या औषध गोळ्या देणे व त्याला व्याधीमुक्त करणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनातील निस्वार्थ केलेली सेवा आहे होय म्हणूनच म्हणतात. परोपकार व  परमार्थ हीच खरी सेवा 
काही ठिकाणी मोठमोठे बसतान मांडून बसलेले महाभाग व झोलाछाप डॉ पेशंटला कसाई प्रमाणे वागणूक देऊन आर्थिक पिळवणूक करताना दिसत आहे . परंतु अपवाद डॉ. रोशन लाहोटी सारखे आज ही समाजा‌ प्रती प्रेम सद्भावना आपुलकी जोपासणारे कार्यरत असल्याने कुठलाही व्यक्ती बिंदास‌ पणे त्यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार करता प्रवेश करतो. परंतु डॉ. साहेब त्यांच्या कडे पैसा आहे किंवा नाही हे कधी ही विचारलेले आठवत नाही कारण त्यांच्या अंगी आई-वडिलांनी चांगल्या प्रकारे जडणघडण करून ज्ञानदाना सोबत माणुसकीचे धडे दिले. म्हणूनच डॉ. रोशन लाहोटी हे लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन आज मंगरूळ नाथ  शहरां मध्ये नाव लौकिक असलेले रोशन लाहोटी हे सर्व दूर परिचित आहेत . 
आज आपल्या समाजात संस्कृती आणि संस्कारांचा अभाव, असहिष्णुता, गुन्हेगारी, व्यभिचार आणि ज्येष्ठांचा अनादर यासारखे वाईट गुण पसरत आहेत.  आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार उदारमतवादी, उदात्त आणि धर्मनिष्ठ आहे.  जिथे जिथे आपल्याला वेदना, त्रास आणि अडचणी दिसतात.  निस्वार्थीपणे सेवा करण्यास तयार होतो.  भारतीय संस्कृती आणि प्रत्येक धर्म उपवास आणि रोजच्या स्वरूपात हा संदेश देतो की आपण मर्यादित अर्थाने जगले पाहिजे आणि इतरांसाठी अन्नाचा त्याग केला पाहिजे, जेणेकरून ते खालच्या वर्गाला सहज उपलब्ध होईल.  प्रचलित राजकारणामुळे आपला सांस्कृतिक वारसा दूषित झाला आहे.  त्यामुळे आपल्या संस्कृतीचा मूळ पाया असलेल्या उदारमतवादी, लोकांचे दर्शन घडते व अशांचे अभिनंदन करणे ही काळाची गरज आहे . 
भरून उन्हात दुपारी दोन वाजताच्या दरम्यान डॉक्टर रोशन लाहोटी  यांच्याकडे गणावर  उपचार सुरू होते तो प्रसंग पाहिल्यावर मन भरून आला डॉक्टर लाहोटीनी गणावर उपचार केले स्वतःच्या खिशातून औषध गोळ्या  व  कोणती फी न घेता उपचार केला काही त्रास असल्यास पुन्हा येऊन भेट हे वाक्य ऐकल्यावर मन अस्तव्यस्त झालं बातमीच्या स्वरूपातून अशा उदार अतकरणवादी डॉक्टर रोशन लाहोटी यांना. त्यांनी केलेल्या सेवेच्या माध्यमातून धन्यवाद देत  त्यांचे  केले तेवढे कौतुक थोडे.
माणसातला देव ओळखणारा डॉक्टर लाहोटी यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

Post a Comment

0 Comments