मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान स्वीकारताना सन्मानाचे धनी पुरुषोत्तम भाऊ चितलांगे
मंगरुळपीर
चितलांगे पेट्रोलियम शेंदुरजना अढाव ला 2022-23 मध्ये विविध ग्राहकोप्रयोगी कार्यक्रम घेऊन ग्राहक सेवेबद्दल हिंदुस्थान पेट्रोलियमचा सेल्स एरियामधील Pinnacle Performer of the year 2022-23 हा Perfomance Excellence Award संभाजीनगर येथिल फर्न रेसिडेंन्सी येथिल वितरकांच्या कार्यक्रमामध्ये दिनांक 24-04-2023 ला एचपिसीएलचे डिजीएम श्री विशालजी शर्मा, लोकेश सिंगसर, आश्विन डोंगरे सर व इतर मानणीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते पुरुषोत्तम भाऊ चितलांगे यांना प्रदान करण्यात आला.चितलांगे इंण्डेण गॅस एजन्सी माध्यमातुन त्यांचे सर्वच क्षेत्रात धडाडीचे कार्य व कर्तृत्व सुरु असते. सर्वांना समानतेची वागणूक देणारे मंगरूळपीर तालुक्यातच नव्हे तर विदर्भात आगळीवेगळी प्रतिमा उभी करणारे सर्वांचे चाहते आदरणीय पुरुषोत्तम भाऊ चितलांगे यांचा जो सन्मान झाला तो खरोखरच वाखण्याजोगा आहे. भाऊंनी गोरगरिबांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून जनसामान्यांच्या सुखदुःखात सदैव सामील होऊन कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता गरीबाच्या झोपडीपर्यंत जाऊन आधार देणारा पंचकोशीतील दाता ग्राहक सेवेबद्दल तत्पर असतात. त्यांचा जो आज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सन्मानाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षा होत आहे.भव्य दिव्य गौरव ,सत्कार समारंभ पार पडला.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments