Ticker

6/recent/ticker-posts

आपण जनतेचे सेवक आहोत याच भान तहसीलदार आवळकंठेंना राहील नाही~ पवळे

 
शिवपाणंद शेतरस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्त्या केल्या असत्या तर  तहसीलदारांना आमचे पेरू गोड लागले असते~ पारनेर तालुका शेतरस्ते पिडीत शेतकरी
शिव पाणंद शेतरस्त्यांच्या शासण निर्णयाची प्रत्यक्ष अमलबजावणी करणे अनिवार्य असुन शेतकर्‍यांकडून सप्तपदी अभियानांतर्गत गोळा केलेल्या अर्जांवर काम होत नसल्यामुळे  लोकशाहमध्ये कायदा हातात घेता येत नाही त्यामुळे आपला मनस्ताप व्यक्त करण्यासाठी पारनेर तहसीलवर सुरु केलेले पेरू वाटत आंदोलन निष्क्रिय तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी आपले पाप झाकण्यासाठी शेतकऱ्यांचे पेरू  फेकून देवून ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषेचा वापर केला तो पदाला शोभणारा नसुन त्यामुळे त्यांना पिढ्यान पिढ्या शेतरस्त्यांसाठी संघर्ष करणारा शेतकरी क्षमा करणार नाही त्यांच्याकडून ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळ्याचा प्रयोग झाला तो वरिष्ठ अधिकार्‍यांसह, लोकप्रतिनिधींनी गांभिर्याने घेवून आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव करून द्यायला हवी~ सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे*
जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्या तालुक्यात लोकशाहीच्या मार्गाने चालु झालेली शिवपाणंद शेत रस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करत विविध आंदोलनाच्या माध्यमातुन जनजागृती करत राज्यात शिवपाणंद रस्त्यांसह, पाझर तलावांच्या शासण निर्णयात मोठे बदल करण्यात आले व अनेक तालुक्यांमध्ये शेतस्ते खुले होताना दिसत आहे नगर जिल्हयात सप्तपदी अभियान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडून राबवण्यात आले त्यात पारनेर तालुक्यातून शेतरस्त्यांसाठी सर्वात जास्त अर्ज करण्यात आले यासाठी आम्ही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला मोठे सहकार्य केले परंतु रस्त्याच्या कामांना मात्र केराची टोपली मिळाली त्यामुळे पुन्हा नव्याने पारनेर तहसीलला पेरु वाटप अंदोलनाचे निवेदन देण्यात आले आंदोलकांच्या निवेदनाची तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दखल घेतली नाही त्यामुळे शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी पेरू वाटप आंदोलन सुरू केले असता तहसीलदारांनी येवून आर्वाच्य भाषेचा वापर करत आपल्या निष्क्रियतेचे पाप लपवण्यासाठी मर्यादेचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना ओरडत बॅनर फाडत   शेतकर्यांचे पेरू फेकून दिले आंदोलन मोडून काढले हा संविधानाचा अपमान असुन लोकशाहीचा घात अधिकारी करत असतील तर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करायला हवी असे मग्रुर अधिकारी लोकशाहीला घातक असुन लवकरच यांची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे करून जिल्हा स्तरावरून प्रलंबीत प्रश्न सोडवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सांगितले यावेळी दशरथ वाळूंज, बाळासाहेब दळवी, रामदास लोणकर, बाळसाहेब औटी, विठ्ठल लोणकर, बाळासाहेब जाधव, हौशिराम कुदळे, प्रशांत खैरे, शंकर खैरे ,संपत जाधव, गणेश कुदळे आदींसह मोठ्या रूंख्येने शेतरस्ते पिडीत शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments