भुसावळ- येथील श्रीमती प.क. कोटचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डी. एम. ललवाणी यांचा तेजस फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे औरंगाबाद येथील डाँ.मौलाना आझाद संशोधन केंद्र सभागृहात राज्यस्तरीय समान समाजभूषण व जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, औरंगाबादचे पोलीस निरीक्षक, शस्त्रागार प्रमुख डाॅ.प्रल्हाद शेळके, कोल्हापुर येथील साहित्यिक, कवयित्री कुमुदिनी मधाळे, सामाजिक कार्यकर्त्या अडॅ. रंजिता कोर तसेच तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा, चित्रपट,लघुपट निर्मात्या, दिग्दर्शिका व अभिनेत्री मेघा डोळस ,लेखक,कवी महेंद्र तुपे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, स्म्रुतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.महेंद्र तुपे यांनी प्रा.ललवाणी यांनी केलेल्या सामाजीक,सांस्क्रुतीक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक व मुक्या प्राण्याविषयी केलेल्या कार्याचा परामर्श घेऊन त्यांनी विविध संघटनेवर कार्यरत राहून विविध पदे भूषवून त्या संघटनांच्या नावलौकिकात भर टाकल्याचे प्रतिपादन केले.प्रा.डाॅ.ललवाणी यांचे सर्व स्तरावरुन,परीवार,समाज व मित्रपरीवाराकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments