Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येथील थरारक घटना ! चिमुकली गॅलरीतून खाली पडली पण, अंगाला खरचटलही नाही

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत ही घटना
अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक लहान चिमुकली पहिल्या मजल्यावरुन, जवळपास 30 फूट उंचीवरुन खाली पडूनही चमत्कारिकरित्या बचावते.
हा व्हिडीओ वाशिम येथील असल्याची माहिती आहे. व्हिडिओमध्ये एक लहान चिमुकली 30 फूट उंचीवरुन खाली पडते. सुदैवाने ती खाली उभ्या असलेल्या गाडीवर पडते, ज्यामुळे तिच्या अंगाला काहीच इजा होत नाही. खाली पडल्यानंतर ती लगेच उठून उभी राहते आणि चालत जाते. ही घटना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षआ कमी नाही.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार वर्षीय चिमुकली घराच्या गॅलरीत खेळत असताना तिचा तोल जाऊन पडली होती. ही घटना प्रत्येक लहान मुलांच्या पालकांसाठी एक धडा आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी अधिक काळजी घ्यावी. विशेषतः त्यांना एकडं सोडून जाऊ नये. 

Post a Comment

0 Comments